Zareen Khan : तूप खाऊन झरीनने 1 वर्षात घटवलं 43 किलो वजन

मुंबई तक

झरीन खान हे नाव सगळ्यांना माहितीये. झरीन सलमान खानसोबत वीर चित्रपटात दिसली होती.

झरीन खान अभिनयाबरोबरच फॅशन सेन्स, फिटनेस आणि ग्लॅमर लुकसाठी ओळखली जाते.

झरीन खानचं वय ३५ वर्ष असलं तरी तिच्या फिटनेसकडे बघून कुणालाही वयाचा अंदाज लावता येत नाही.

झरीन खानचं वजन पूर्वी १०० किलो होतं. एका वर्षात अभिनेत्रीने तब्बल ४३ किलो वजन घटवलं.

झरीन खानचं वजन आता ५७ किलो आहे.

झरीन खानने फेमिना मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मी कधीही डाएटिंग केली नाही. मी सर्व पदार्थ खायचे मात्र थोड्या प्रमाणात.

झरीन खान सांगते, चुकीच्या पद्धतीने जेवण आणि एकाच वेळी पोटभरून जेवण बंद केलं.

झरीन खान दररोज गावरान तूप खायची. तिच्या म्हणण्यानुसार तूप तुमचं शरीर मजबूत बनवतं.

झरीन खान सर्व भाज्या ऑलिव्ह वा रिफाईंड तेलाऐवजी तूपातच बनवायची.

झरीन खानने वजन कमी करण्यासाठी पिलाटीज, वेट ट्रेनिंगने सुरुवात केली. स्वीमिंग क्लासही केला. त्याचबरोबर ती योगाही करायची.