Blog : Long Covid आणि नाक, कान घसा यांच्या समस्यांशी कसा लढा द्यायचा?
कोरोना रूग्ण ICMR

Blog : Long Covid आणि नाक, कान घसा यांच्या समस्यांशी कसा लढा द्यायचा?

वाचा फोर्टिस रूग्णालयाच्या डॉक्टर सोनाली पंडित यांचा लेख

डॉ. सोनाली पंडित आणि डॉ. किर्ती सबनीस यांचा लेख

एकीकडे आपण कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराशी सामना करतो आहोत. कोरोनाची दुसरी लाट कशी संपेल याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. तर दुसरीकडे कोरोनातून बरं होणाऱ्या रूग्णांमध्ये विविध लक्षणं पाहण्यास मिळत आहेत. त्याला लाँग कोव्हिड असं म्हटलं जातं. लाँग कोव्हिड सिंड्रोम असंही त्याला म्हटलं जातं. कोव्हिड संसर्गाला आठवडे उलटल्यानंतरही श्वास लागणं, डोकं दुखणं, तोंडाची चव जाणं, ऐकू न येणं, चक्कर येणं, खोकला, भरलेलं नाक, कानात वाजल्यासारखं वाटणं या समस्या लोकांना जाणवतात. यालाच लाँग कोव्हिड असं म्हटलं जातं. कान, नाक, गळा याच्याशी संबंधितही अडचणी लोकांना जाणवतात. त्यामुळे लोकांना याची जास्त चिंता वाटते. त्यामुळे लोकांना डिप्रेशनही येतं.

कोव्हिड कधीपर्यंत कान, नाक, घसा यांच्याशी संबंधित समस्यांचं कारण ठरतो?

कोव्हिड मुख्यतः श्वासनलिका आणि त्यावरील अवयवयांशी संबंधित आजारांचं कारण ठरतो.जसं की नाक बंद होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, गळ्यात खरखर वाटणं, वास न येणं याला त्रास होतो. खोकला, छातीत दुखणं अशीही लक्षणं जाणवतात. कोव्हिडची हलकी लक्षणं असणाऱ्या अधिकांश लोकांमध्ये नीट वास न येणं, सतत कसला तरीही वास येतो आहे अशी धारणा, वास कमी होणं अशी लक्षणं जाणवतात. ही लक्षणं काही आठवडे राहतात. चार आठवड्यांपेक्षा जास्त लक्षणं राहिली तरीही डॉक्टरांना लगेच दाखवावं.

वास जाण्यासोबत अनेकांच्या तोंडाची चवही जाते किंवा लोक तशी तक्रार करतात. काही लोकांमध्ये कोरोनातून बरं झाल्यानंतर काही लोकांना ऐकू न येण्याची समस्या जाणवली किंवा कमी ऐकू येऊ लागलं. आणखी एक जाणवणारी तक्रार म्हणजे व्हर्टिगोचाही त्रास जाणवतो. जे लोक आयसीयूतून बाहेर येतात आणि कोव्हिडमधून बरे होतात त्यांना कानात घंटा वाजल्यासारखी वाटणं अशीही लक्षणं जाणवली आहेत.

अनेकांना सातत्याने डोकं दुखणं आणि चेहरा दुखणं या समस्याही जाणवातात. अशा समस्या जाणवऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसची सुरूवातही असू शकते. ब्लॅक फंगस हे आधी नाकात आणि मग नाकाद्वारे मेंदूत पोहचू शकतं.

उपचारांच्या पद्धती काय आहेत?

एनोस्मिया, हायपोस्मिया यांसारख्या स्मेल डिस्फंक्शन या काही मर्यादित अवधीसाठी येणाऱ्या अवस्था आहेत. एक चतुर्थांश रूग्ण चार आठवड्यात बरे होतात. कोव्हिड 19 नंतर स्मेल न्यूरॉन्स डॅमेज होत नाहीत. पण सहाय्यक कोशिकांची हानी होते. व्हायरस जेव्हा रूग्णाचं शरीर सोडतो तेव्हा या कोशिका सामान्य होतात. त्यानंतर वास येणं, चव येणं या सगळ्या गोष्टी परत येतात. काही आठवड्यानंतर जेव्हा वास किंवा चव पारत आली नाही तर डॉक्टर नेझल स्प्रे, डिकॉन्जेस्टेंट नेझल स्प्रे आणि ओलोफ्कॅक्ट्री यासारखे सल्ले देतात. ज्याच्या वापरानंतर गंध परत येतो.

चव जाणं हीदेखील अशीच एक अवस्था आहेत. यामधूनही लोक काही आठवड्यांमध्ये ठीक होतात. जर ही लक्षणं दीर्घकाळ असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

ऐकू न येणं याची सुरूवात अचानक येणं याची लक्षणं काही रोग्यांना तातडीने जाणवू लागतात. अशावेळी E&T स्पेशालिस्टकडे दाखवा. श्रवणशक्ती कमी होते, श्रवणशक्तीसाठी चाचणी केली जाते त्याला ऑडियोग्राम केलं जातं. उपचार पद्धतींमध्ये आयव्ही, मौखिक स्टेरॉईड आणि इअरड्रममध्ये स्टेरॉयडचं इंजेक्शनही दिलं जातं. यातून जर या ऐकू येणं, चव येणं या गोष्टी पूर्ववत होतीलच अशी शाश्वती देता येत नाही. मात्र लवकरात लवकर ही लक्षणं ओळखणं आणि डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं ठरतं. उपचार करणारे डॉक्टर रूग्णाच्या फुफ्फुसांमध्ये कोव्हिड संक्रमण आणि ब्लड शुगर कशी आहे त्याबाबत सर्वोत्तम पर्याय शोधण्यासाठी उपाय करतात. म्युकरमायकोसिसचं निदान लवकर झालं तर अँटी फंगल औषध आणि सर्जरी यामुळे रूग्ण लवकर बरे होण्याचे चान्सेस वाढतात.

हेदेखील पाहणं पाहणं महत्त्वाचं असतं की उपचारासाठी प्रत्येक रूग्णावर केली जाणारी उपचार पद्धती वेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येक रूग्णावर उपचार केले जातात. त्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या E&T च्या समस्या जाणवू शकतात. थोडाही त्रास जाणवू लागला तर डॉक्टरांकडे जा दुर्लक्ष करू नका. जेणेकरून तातडीने उपचार सुरू केले जातील आणि मोठा आजार किंवा इतर कोणताही त्रास होण्यापासून तुम्ही वाचू शकाल.

(डॉ. सोनाली पंडित, कन्सल्टंट कान, नाक, घसा, फोर्टिस रूग्णालय मुलुंड आणि डॉ. किर्ती सबनीस, साथरोग आजार स्पेशालिस्ट यांचा लेख )

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in