Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात 'या' तारखेला विधानसभा निवडणूक, आयोगाची पत्रकार परिषद सूरू
Sushma Andhare Speech : लाडकी बहीण योजना अजित दादांनी जाहीर केली. त्यामुळे सर्व नेत्यांना बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे.
ADVERTISEMENT
- 04:04 PM • 28 Sep 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सूरू
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सूरू
- 09:04 AM • 28 Sep 2024
"अजित पवारांनी...", लाडकी बहीण योजनेबाबत सुषमा अंधारेंचं मोठं विधान
Sushma Andhare On Ladki Bahin Yoajana : लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना अजित दादांनी जाहीर केली. त्यामुळे सर्व नेत्यांना बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे. सर्व नेत्यांना बहिणीबद्दल किती प्रेम आहे, किती त्याग करू शकतो हे दाखवण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाली आहे. त्यामुळे नामदार धनंजय मुंडे आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम करतात. त्या प्रेमापोटी ते प्रीतम ताईंसाठी परळीची जागा सहज सोडून देतील. अजितदादांनी बारामतीत बहिणीबद्दल ती संधी गमावली. त्यांनी चुकून उमेदवार उभा केला होता. पण त्यांना चूक सुधारण्याची संधी आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे लाडकी बहीण योजनेबाबत पुढे म्हणाल्या, टॅक्सचे पैसे गोळा करून त्यांनी हे पैसे दिलेत. बॅनर असे लावले की यांनी स्वतःची घर दार विकून पैसे दिलेत. आपल्याकडे परंपरा आहे, बहिणीचे लग्न करायचे, शिक्षण करायचे, काहींनी बहिणीच्या लग्नासाठी वावर गहाण ठेवली तर विकली सुध्दा...भाऊ बहिणीला चोरून मदत करतो तुमच्या सारखे बॅनर लावत नाही. ज्यांनी योजनेचे बॅनर लावले ते मतासाठी टपलेले संधीसाधू.
ADVERTISEMENT