Maharashtra Live News Updates : महाविकासआघाडी-महायुतीनं एकमेकांविरोधात उपसलं आंदोलनाचं हत्यार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Issue
social share
google news
  • 12:21 PM • 01 Sep 2024

    Uddhav Thackeray: 'महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका', उद्धव ठाकरेंचा घणाघात

    Uddhav Thackeray On Narendra Modi : आपल्या महाराष्ट्राने पहिला नौदल दिन मोठ्या दिमाखात साजरा केला होता. पण त्याचवेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून शिवरायांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. माफी तुम्ही कुणा कुणाची मागणार? घाईगडबडीनं संसद भवन उभं केलं म्हणून तुम्ही माफी मागणार? दिल्लीच्या विमानतळाची छत कोसळत आहेत, सर्व गोष्टींबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपले महामहीम राष्ट्रपती म्हणाले आता बस्स झालं. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केला आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि करणार नाही. महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका. 

  • 11:48 AM • 01 Sep 2024

    Mahavikas Aaghadi Protest :महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी रोखलं

    महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन सुर केलं आहे. मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा मविआचा निषेध मोर्चा असणार आहे. तत्पूर्वी मविआच्या नेत्यांना पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही मविआने महायुतीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआने सरकारला धारेवर धरलं आहे. 
     

     

  • 10:16 AM • 01 Sep 2024

    ...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, संजय राऊतांनी सांगितलं कारण

    या राज्यात ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते, त्यांनी अपमान केला. मग त्यांनी माफी मागितली. काही मंत्र्यांनी केला, त्यांनीही माफी मागितली. सध्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणतात, पुतळा तुटला याचे दु:ख कशाला करायचं, वाईटातून चांगलं घडलं. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि वाईटातून चांगलं घडतं. ही यांची विकृती आणि मनोवृत्ती आहे. राजकोट किल्ल्यावर जो पुतळा कोसळला, हा सरळा भ्रष्टाचार आहे. आपापल्या लोकांना कामं देण्यास जी स्पर्धा सुरु आहे, त्यातून हा पुतळा कोसळला. 
     

  • 09:37 AM • 01 Sep 2024

    MVA vs Mahayuti : मविआचा सरकार विरोधात एल्गार! मुंबईत करणार जोडे मारो आंदोलन

    सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. महाविकास आघाडीकडून महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी महायुतीविरोधात मुंबईत मोर्चा काढणार आहे. महायुतीने शिवरायांची माफी मागितली आहे, तरीही मविआने आंदोलन सुरुच ठेवलं आहे, त्यामुळे मविआला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुती आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे. हा मोर्चा आडवण्यासाठी पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. शिष्टमंडळाच्या माध्यमातून नेते गेट वे ऑफ इंडियाकडे निघाले, तर अडवणार नाही, अशी पोलिसांची माहिती असल्याचं समजते.

  • ADVERTISEMENT

  • 09:16 AM • 01 Sep 2024

    राज्यभरातील भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात होणार सहभागी

    भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने राज्यभरातील महाविकास आघाडीच्या विरोधात एक भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. शिवरायांच्या पवित्र पुतळ्यासमोर हे आंदोलन आयोजित करून, मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्याचे उद्दिष्ट आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे करतील. तर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्गच्या राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबद्दल माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करत आहे, त्याचा निषेधार्थ महायुती आंदोलन करणार आहे. 

    1. नागपूर: भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे

    2. मुंबई: भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार आणि आ. प्रसाद लाड 
    3. लातूर: रावसाहेब पाटील दानवे
    4. सिंधुदुर्ग: खासदार नारायण राणे 
    5. रत्नागिरी: मंत्री आ. रवींद्र चव्हाण
    6. ठाणे: आ. संजय केळकर आणि आ. निरंजन डावखरे 
    7. कराड: प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील
    8. पुणे: युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे 
    9. छत्रपती संभाजी नगर: मंत्री आ.अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आणि खासदार भागवत कराड
    10. नाशिक: आ. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे आणि आ. सीमा हिरे
    11. जळगाव: आ. राजू मामा भोळे आणि आ. मंगेश चव्हाण
    12. पालघर: खासदार हेमंत सावरा

  • 09:11 AM • 01 Sep 2024

    BJP vs Mahavikas Aaghadi : शिवरायांच्या पुतळ्यासमोर मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

     BJP Protest Againts Mahavikas Aaghadi : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरातील महाविकास आघाडीच्या विरोधात एक भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. शिवरायांच्या पवित्र पुतळ्यासमोर हे आंदोलन आयोजित करून, मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे करणार आहेत. तर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आज रविवार 1 सप्टेंबर 2024 सकाळी 9.00 वाजता, संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन एकाच वेळी सुरु होईल. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून हे आंदोलन आहे. मविआच्या नेत्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे.


     

follow whatsapp

ADVERTISEMENT