पुण्यात फटाक्यांमुळे आगीच्या १७ घटना, औंधमध्ये फोर बीएचके फ्लॅट जळून खाक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळीचा (लक्ष्मीपूजन) सण काल सर्वांनीच मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला. मात्र सोमवारी पुणे शहरात फाटक्यामुळे आगीच्या १७ घटना घडल्या.तर या घटनांमध्ये औंध येथे फोर बीएचके फ्लॅट जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

आग लागल्याच्या पुण्यात १७ घटना

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी ७ ते रात्री १२ पर्यत फटाक्यांमुळे आगीच्या १७ घटना घडल्या. त्याच दरम्यान औंध येथील डीपी रोडवरील इंडियन बँके जवळील १२ मजली टेरेजा सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये आग लागली असल्याची माहिती १०.३० वाजण्याच्या सुमारास आम्हाला मिळाली.

औंधमध्ये फोर बीएचके फ्लॅट जळून खाक

अग्निशमन दलाची टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्यावर काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र तोवर चार बीएचकेचा फ्लॅट (२६०० स्क्वेअर फूट) पूर्णपणे जळून खाक झाला.या आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर टेरेसवर असलेल्या नागरिकांना खाली आणण्यात आले.तर संबधित फ्लॅट धारकाकडे चौकशी केली असता.घरांमध्ये बाहेरून फटका आल्याने आग लागल्याच त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फटाक्यांमुळे हैदराबादमध्ये १० जण जखमी

फटाके उडवत असताना अपघात होऊन हैदराबादमध्ये १० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे असं कळतं आहे. हैदराबादच्या सरकारी रूग्णालयातील डॉ. नजाबी बेगम यांनी सांगितलं की आमच्याकडे फटाक्यांमुळे अपघात झाल्याची १० प्रकरणं आली आहे. त्यातल्या चार जणांना गंभीर इजा झाली आहे. एका लहान मुलाने त्याचा डोळा गमावला आहे. तर इतर तिघांवर सर्जरी करण्यात येणार आहे.

दिवाळी हा देशातला सर्वात मोठा सण मानला जातो. गोडधोड खाऊन आणि फटाके उडवून हा सण साजरा करतात. मागच्या दोन वर्षांमध्ये फटाके उडवण्याला आणि दिवाळीचा सण साजरा करायला कोरोनामुळे मर्यादा आल्या होत्या. मात्र यावर्षी निर्बंधाशिवाय दिवाळी पार पडते आहे. असं असलं तरीही अशा काही अप्रिय घटना समोर येत आहेत. ज्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडतं आहे. दिवाळीच्या वेळी फटाके उडवत असताना कुणाला इजा होणार नाही याची काळजी घ्या हे सांगितलं जातं. मात्र आता तरीही पुणे, हैदराबाद, ठाणे या ठिकाणी आग लागण्याच्या आणि लोकांना इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT