
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली
Accident On Pune Bangalore Highway : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हे सगळेजण जयसिंगपूर येथील आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगावजवळ कारने कंटेनरला मागून जोराची धडक दिली. यात घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
येवलेवाडी फाट्यावर हॉटेल शर्यत समोर हा भीषण अपघात झाला. महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर ( एमएच ०५ ए एम ३६४४ ) थांबलेला होता. कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार ( एमएच १४ डी एन ६३३९ ) ने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. अपघात स्थळी भयानक विदारक चित्र होते. रक्ताच्या थारोळ्यात सर्व जण कार मध्ये अडकून पडले होते.या काही नागरिकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
यामध्ये कारमधील चालक अरिंजय आण्णासो शिरोटे ( रा.जयसिंगपूर ) यांच्यासह एक महिला स्मिता अभिनंदन शिरोटे ( वय ३८ ) आणि तीन मुले पूर्वा अभिनंदन शिरोटे ( वय १४ ) , सुनिशा अभिनंदन शिरोटे ( वय ० ९ ) , वीरेन अभिनंदन शिरोटे ( वय ०४ ) गंभीर जखमी झाले होते. यामधील तिघांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे तर दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे .
यावेळी महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. अरिंजय नौदलात नोकरीत होते. सुट्टीला आल्यावर पिंपरी चिंचवड येथून मूळ गावी जाताना अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अरिंजय नौदलात नोकरीत होते. सुट्टीला आल्यावर पिंपरी चिंचवड येथून मूळ गावी आज पोहचणार होते. त्यांनी दोन वाजून पाच मिनिटांनी वडिलांशी फोनवरून संपर्क साधला होता. आम्ही तासाभरात घरी येतोय असा निरोप अखेरचा ठरला.
अपघातातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सिटचा भाग देखील पूर्णपणे तुटलेला होता.