केतकी चितळेला दिलासा नाहीच! जामीन अर्जावरचा निर्णय कोर्टाने ठेवला राखून

कोर्टाने केतकी चितळेला कोणताही दिलासा आज दिलेला नाही
Actress ketki chitale is not relieved the court reserve the decision on the bail application
Actress ketki chitale is not relieved the court reserve the decision on the bail application(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच गोरेगाव पोलिसांनीही तिचा ताबा घेतला आहे. आज दुपारच्या सुमारास तिच्या जामिनावरही सुनावणी सुरू होती. मात्र केतकीला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कारण केतकी चितळेच्या जामीन अर्जावरचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे.

केतकी चितळे प्रकरणात तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर कोर्ट निर्णय देणार आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला आजपर्यंत (१८ मे) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तिची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र तिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचप्रमाणे तिच्या जामीन अर्जावरचा निर्णय राखून ठेवला आहे.

केतकी चितळेची जे. जे. रूग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तिला डोकेदुखी आणि फिट्सचा त्रास असल्याने जे जे रूग्णालयात नेण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पोलीस केतकी चितळेला ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. ठाणे कोर्टाने तिला आज तरी दिलासा दिलेला नाही.

Actress Ketaki Chitale remanded in judicial custody for 14 days
Actress Ketaki Chitale remanded in judicial custody for 14 days(फोटो सौजन्य: Instagram)

केतकीच्या अडचणींमध्ये भर

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आता मुंबई पोलीसही केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तसंच आता केतकी चितळेच्याबाबतीतही होण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात १५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

केतकीने काय युक्तिवाद केला होता?

केतकीने कोर्टात युक्तीवाद करताना हे म्हटलं होतं की जी पोस्ट मी शेअर केली आहे, ती पोस्ट माझी नाही. सोशल मीडियातून कॉपी करून मी ती पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असाही प्रश्न केतकीने विचारला होता. एवढंच नाही तर मी पोस्ट डिलिट करणार नाही तो माझा अधिकार आहे असंही तिने कोर्टाला सांगितलं होतं.

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबद्दल दि . १३ मे रोजी बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता . ज्यात संत तुकाराम यांचा देखील उल्लेख करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून केतकी चितळेविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे .

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in