Aryan Khan ने अटकेनंतर NCB ला पासवर्ड दिला नाही, अधिकाऱ्यांनी वापरली 'ही' ट्रिक

जाणून घ्या आर्यन खानने जेव्हा फोनचा पासवर्ड दिला नाही तेव्हा एनसीबीने केली ही ट्रिक
Aryan Khan had refused to give password to NCB. They opened it using his face ID
Aryan Khan had refused to give password to NCB. They opened it using his face ID(फाइल फोटो)

द नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने म्हणजेच एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचा जबाब अनेकदा नोंदवला होता. मात्र त्यांचा मुख्य जबाब तेव्हा नोंदवला गेला जेव्हा त्याला जामीन मंजूर झाला. आर्यन खानला २७ ऑक्टोबर २०२१ ला जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर तो ३० ऑक्टोबरला तुरुंगातून बाहेर आला. यानंतर १२ नोव्हेंबरला जेव्हा त्याची डिटेल बेल ऑर्डर आली त्यादिवशी त्याचा जबाब नोंदवला गेला. त्याची चौकशी झाली तेव्हा त्याच्या फोनचा पासवर्ड त्याने दिला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एक ट्रिक वापरली आणि त्याचा फोन ओपन केला.

आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टात जामीन मिळाला. त्याआधी त्याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२१ या महिन्यात त्याला दोनवेळा जामीन नाकारण्यात आला होता. मात्र त्याला जामीन मंजूर केला गेल्यानंतर सदर प्रकरणाचा तपासही एनसीबीकडून विशेष तपास समितीकडे आला. आर्यन खानने हे सांगितलं होतं की तो त्याच्या मित्रांसह ग्रीन गेट या ठिकाणी गेलो होतो. तोपर्यंत त्याच्याकडे क्रूझचा बोर्डिंग पास नव्हता. कॉर्डिलिया क्रूझ इव्हेंटच्या दोन दिवस आधी आम्ही तिथे जायचं ठरवलं. मी तिथे व्हिआयपी गेस्ट होतो असंही आर्यनने सांगितलं आहे. एवढंच नाही तर क्रूझवर जाताना जे सिक्युरिटी चेकिंग झालं त्यात मी माझी बॅग दिली होती मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही असंही आर्यन खानने सांगितलं.

Aryan Khan had refused to give password to NCB. They opened it using his face ID
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांना का मिळाला जामीन? काय म्हणालं बॉम्बे हायकोर्ट?

आर्यन खानने सांगितला नाही फोनचा पासवर्ड

आर्यन खानचा पहिला जबाब ज्यावेळी नोंदवला गेला त्यावेळी एनसीबीच्या तपास अधिकाऱ्याने त्याला त्याच्या मोबाइलचा पासवर्ड विचारला. तसंच त्याचा फोनही ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर सुमारे महिन्याभराने एनसीबीच्या एसआयटीने हा तपास हाती घेतला. कारण आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. एसआयटीकडे जेव्हा आर्यन खानचा फोन आला त्यावेळी त्यांनी आर्यन खानला फोनचा पासवर्ड काय ते विचारलं. तो पासवर्ड देण्यास आर्यन खानने नकार दिला.

Aryan Khan had refused to give password to NCB. They opened it using his face ID
आर्यन खान प्रकरणातील NCB चे दोन तपास अधिकारी निलंबित, कारण गुलदस्त्यात

यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्याने सरळ आर्यनच्या चेहऱ्यासमोर त्याचा फोन नेला आणि फेस आयडीचा वापर करत त्याचा लॉक असलेला फोन ओपन केला. यानंतरच त्याचे ड्रग्ज संदर्भातले चॅट एसआयटीला सापडले. आर्यनने हे सांगितलं की तुम्ही ज्या चॅटबद्दल विचारत आहात ते लॉस एंजल्स, अमेरिका या ठिकाणचे आहेत. एवढंच नाही तर मी अरबाझ मर्चंटला गेल्या पाच सात वर्षांपासून ओळखतो. आम्ही ऑनलाइन गेम्स खेळत होतो असंही त्याने सांगितलं.

ड्रग्जचं कोडनेम होतं धोका

आर्यन खानने त्याचे फोन नंबर काही जणांना दिले होते. तसंच पासवर्डही दिले होते. मात्र ते चुकीचे होते. आर्यन खानने हे मान्य केलं होतं की त्याच्या फोनमध्ये ड्रग्जशी संबंधित काही चॅट्स आहेत. त्याने आचित सोबतही ड्रग्ज संदर्भात चॅट केल्याचं मान्य केलं. आचित हा याच प्रकरणातला दुसरा आरोपी आहे. यामध्ये ड्रग्जचा कोडवर्ड धोका असं होतं. धोका खरेदी करू, धोका घेऊ... असे आणि या आशयाचे काही उल्लेख आहे. मात्र हे आपले चॅट इथले नाहीत असंही आर्यन खानने सांगितलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in