
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. भाजपच्या दोन प्रवक्त्यांच्या विरोधात आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवत हा मोर्चा काढला गेला. शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. दिल्ली गेट भागात हे आंदोलन करण्यात आलं. एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम असताना औरंगाबाद, सोलापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. तर अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र त्यांनी हे वक्तव्य केल्याचे पडसाद आखाती देशातही उमटले. आखाती देशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी माफी मागितली. भाजप पक्षानेही त्यांच्यावर कारवाई केली, पण हे प्रकरण थांबताना दिसत नाही.
भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी नुपूर शर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला त्यांनी 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. तसंच आता आज महाराष्ट्रात सोलापूर, औरंगाबाद य़ा ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तर अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. प्रेषित पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. सोलापूरसह अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला आहे. तसंच बंदही पाळण्यात आला. देशभरातल्या मुस्लिम संघटनांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवला. सोलापुरात एमआयएमने भव्य मोर्चा काढला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली असून नुपूर शर्मांना अटक करा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
अहमदनगरमध्ये बंदची हाक
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी बंदची हाक दिली. नुपूर शर्मा यांना अटक करा ही मागणी करत हा बंद पाळला गेला. हा बंद शांततेत पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. देशात जातीय द्वेष पसरवणारं राजकारण बंद केलं गेलं पाहिजे असंही आवाहन करण्यात आलं.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. भाजपने त्यांना पक्षातूनही निलंबित केलं आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी देशभरात विविध ठिकाणी ५० हून जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.