Aurangabad Protest : औरंगाबादकरांना शिवसेनेने काय दिलं? पाणी प्रश्नावरून फडणवीस आक्रमक

वाचा काय काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
Aurangabad Protest : औरंगाबादकरांना शिवसेनेने काय दिलं? पाणी प्रश्नावरून फडणवीस आक्रमक
Devendra Fadnavis critized Shiv Sena for water crisis in Aurangabad

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात जनता पाण्यासाठी तडफडते आहे या शहराने शिवसेनेला खूप काही दिलं आहे. पण शिवसेनेनं त्यांना काय दिलं? असा प्रश्न आज देवेंद्र फडणवीस यांनी आक्रोश मोर्चात विचारला. औरंगाबादमध्ये आज पाणी प्रश्न भाजपने आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण चालवले आहेत.

औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपकडून मोर्चा सुरू केला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला असून यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर यावेळी बोलताना ते म्हणाले, हा आक्रोश आहे औरंगाबादच्या जनतेचा, अशा प्रकारे औरंगाबादच्या जनतेला या सरकारने आणि महानगरपालिकेतील शिवसेनेने केवळ या ठिकाणी भावनेचे राजकारण केलं. पण थेंबभर पाणी देखील औरंगाबादला देऊ शकले नाही.

 Devendra Fadnavis critized Shiv Sena for water crisis in Aurangabad
Devendra Fadnavis critized Shiv Sena for water crisis in Aurangabad

आमच्या सरकारच्या काळात ही १६०० कोटी मंजूर केली, पण त्यातील ६०० कोटी रुपये महानगर पलिकडे मागितले आहे. पण त्याचे सुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाहीत. हा आक्रोश औरंगाबादच्या जनतेचा असून याचा सामना सरकारला करावेच लागणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. याच मार्गावर आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वखाली मोर्चा काढला आणि सत्ता बदलली होती .

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की नाही? असा प्रश्न पडत आहे. औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीच शहर आहे हे त्यांना माहितच नाही वाटते. या सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

 Devendra Fadnavis critized Shiv Sena for water crisis in Aurangabad
Devendra Fadnavis critized Shiv Sena for water crisis in Aurangabad

"गेल्या 25 वर्षाच्या काळात शिवसेनेने औरंगाबादच्या पाण्याचा सत्यानाश केला. महापालिकेकडे एकही पैसा उरला नाही. आता जे काही चाललंय ते केवळ केंद्र सरकारच्या पैशावर सुरू आहे. महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. संभाजीनगरमध्ये जे काही झालं ते आमच्या काळात झालं. आताचं सरकार हे पाण्याचं शत्रू आहे."

संभाजीनगरच्या आजच्या या मोर्चाने महाराष्ट्राला हादरवून सोडला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, "आजचा मोर्चा हा संभाजीनरगच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा आहे. आजची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराविरोधातील हा मोर्चा आहे. संभाजीनरगमधील जनता पाण्यासाठी तडफडतेय, त्याकडे शिवसेनेने दुर्लक्ष केलं आहे. आजचा मोर्चा हा जनतेच्या आक्रोशाला संघटित करणारा मोर्चा आहे. संभाजीनगरला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही." असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in