Ahmednagar : औरंगजेबाचे पोस्टर झळकावलं, गुन्हा दाखल झालेले ‘ते’ चार लोक कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

aurangzeb posters during procession video viral four people case registered ahmednagar Maharashtra
aurangzeb posters during procession video viral four people case registered ahmednagar Maharashtra
social share
google news

Latest Marathi News Updates : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) मुघल सम्राट औरंगजेबाचे पोस्टर (Aurangzeb posters) झळकावल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या फकीरवाडा परीसरात ही घटना घडली होती. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक तरूण औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाचताना दिसला होता. या व्हिडिओवर राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. यानंतर आता औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याप्रकरणी 4 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. (aurangzeb posters during procession ahmednagar video viral four people case registered)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या फकीरवाडा परीसरात रविवारी सकाळी मुघल सम्राट औरंगजेबाचे पोस्टर (Aurangzeb posters) घेऊन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत नागरीकांनी गाणे वाजवून डान्स केला होता. तर मिरवणूकीतील चार जणांनी मुघल सम्राट औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन झळकावले होते. या संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, अशी माहिती भिंगार कॅम्प पोलिसांनी दिली होती. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर झाल्यानंतर एका मिरवणूकीत ही घटना घडली होती. या घटनेत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देखील दिल्याची माहिती समोर आली होती.

हे ही वाचा : मोबाइल गेममधून सुरु होतं मुलांचं धर्मांतर, काय आहे मुंब्रा कनेक्शन?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

या प्रकरणावर सोमवारी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. “जर कुणी औरंगजेबाचे पोस्टर झळकावले असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा कृत्यांना माफ केले जाणार नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. देशात आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे पूज्य दैवत आहेत. त्यामुळे कुणी औरंग्याच नाव घेतलं असेल तर त्याला माफी नाही,असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मांडलीय. तर शिवसेना (UBT) आमदार अंबादास दानवे यांनी सरकार अशा घटना उघडकीस आल्यावर कठोर कारवाईचे मोठे दावे करते, परंतु कारवाई करण्यात अपयशी ठरते,असा गंभीर आरोप केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान आता औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी चार व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली एका समुदायाला दुसर्‍या समुदायाविरुद्ध गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : मेलेल्या आईच्या टाळूवरचा लोणी खाणारा मुलगा, 6 वर्ष राहिला ‘तिच्या’ मृतदेहासोबत अन्…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT