बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार

Beed Crime : सामूहिक बलात्कार प्रकरणात चौघांवर गुन्हा : 'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार
i was raped threatens to make nude photos viral 10th student commits suicide by writing suicide note(प्रातिनिधिक फोटो)

राज्यात महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ज्वलंत बनलेला असताना बीड जिल्ह्यात अस्वस्थ करणारी घटना घडली आहे. नात्यातील चार तरुणांनीच महिलेला ब्लॅकमेल करत सामूहिक अत्याचार केला. अहमदनगर, बीड जिल्ह्यात अत्याचार घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्या आली आहे.

बीडमधील एका २४ वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या तरुणाने अहमदनगर शहरात अत्याचार केला. दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केला. तिन्ही नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यासह पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार २४ वर्षीय विवाहिता आपल्या २ लहान मुलं, नवरा आणि सासुसह पुण्यात राहते. मात्र, नवऱ्यासोबत ४ एप्रिल रोजी किरकोळ भांडण झाल्यानं, ती माहेरी बीडला आली होती. माहेरी आल्यानंतर 'तू एकटीच का आली? तू परत तुझ्या नवऱ्याकडे जा," पीडितेला तिच्या आईनं सांगितलं.

त्यानंतर पीडिता बीड शहरातील आपल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली. ११ एप्रिलला रोजी पीडिता रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाली. यादरम्यान पीडितेचा नात्याने चुलत पुतण्या असणारा आरोपी अजय गवते याने फोन केला. 'मला काकांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं आहे. तुम्ही अहमदनगरच्या चांदणी चौकात उतरा,' असं म्हणाला.

संभाषणानंतर पीडिता सांगितलेल्या ठिकाणी उतरली. काही वेळात आरोपी अजय तिथं आला आणि आता खूप रात्र झालीये, आपण इथल्या लॉजवर मुक्काम करू आणि उद्या निघू असं म्हणाला. त्यानंतर लॉजवर आल्यावर अजयनं गुंगीचं ज्यूस दिलं. लॉजवर बलात्कार केला. अश्लील फोटो व्हिडिओ देखील काढले.

दुसऱ्या दिवशी नराधम आरोपी अजयने जिपमध्ये बसवून पीडितेला पुन्हा बीडला पाठवले. दरम्यान पीडिता हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी असताना, बेलुरा गावातील दत्ता गवते याचा फोन आला. यावेळी तो म्हणाला, 'अजयचे अश्लील व्हिडीओ माझ्याकडे आहेत, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल,' असं म्हणत त्याने पीडितेला ब्लॅकमेल केलं.

त्यांनतर तो हॉस्पिटलजवळ आला आणि आता रात्र झाली आहे तुम्ही माझ्या घरी चला. असं सांगितल्यानं पीडिता त्याच्या दुचाकीवर बसून काठवटवाडी येथे रात्री दहा वाजता आल्या. मात्र यावेळी दत्ता गवते याने दुचाकी घराकडे नेण्याऐवजी दुचाकी ओढ्याजवळ थांबवली. तेव्हा दत्ता गवते याने मागुन दुचाकीवर येणाऱ्या परमेश्वर गवते यास बोलावले आणि दोघांनी धरुन बाजुच्या शेतातील विहिरीजवळ घेवून गेले.

यावेळी लगेच फोन करुन पप्पु गवते यास बोलावुन घेतले. पप्पु गवते तेथे आल्यावर दत्ता व परमेश्वरने पीडितेला धरुन ठेवलं. पप्पु गवते याने अतिप्रसंग करत बलात्कार केला. नंतर दत्ता गवते, परमेश्वर गवते, पप्पू गवतेंनी रात्रभर मारहाण करत छेडछाड केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता दत्ता व परमेश्वरने पीडितेला नवगण राजुरी येथील बसस्टॉपवर सोडले. त्यानंतर पीडिता तिच्या आईकडे गेली आणि दोन ठिकाणी घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर नवऱ्याला देखील आपबिती सांगितली.

पीडितेनं बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. यावरून नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या नराधम अजय गवते याच्यावर बलात्काराचा, तर दत्ता गवते, परमेश्वर गवते, पप्पू गवते या नराधमांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.