भरत गोगावले आदिती तटकरेंबद्दल असं काय बोलले की रोहित पवार भडकले?
आदिती तटकरे मंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद जाण्याची चर्चा सुरू झाल्याने भरत गोगावले यांनी अजब वक्तव्य केले.
ADVERTISEMENT

लेंMaharashtra Politics : खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाने वाद उभा राहिला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांसोबत घेऊन सत्तेत सामील झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची अडचण झाली आहे. आदिती तटकरे मंत्री झाल्यामुळे त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद जाण्याची चर्चा सुरू झाल्याने भरत गोगावले यांनी अजब वक्तव्य केले. त्यामुळे रोहित पवार चांगलेच भडकले.
अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आले आणि महायुती अस्तित्वात आली. पण, नव्या गड्यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे. शिवसेनेतील आमदारांची नाराजीही लपून राहिलेली नाही. त्याचबरोबर मिळणाऱ्या जास्तीच्या मंत्रिपदावरही पाणी फेरलं गेलं आहे. अशात शिंदेंच्या सेनेतील अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. त्यांनी अनेकदा ही इच्छाही बोलून दाखवली असून, यात भरत गोगावलेंचाही समावेश आहे.
गोगावले आदिती तटकरेंबद्दल काय बोलले?
भरत गोगावलेंचं मंत्रिपदाबरोबरच लक्ष आहे ते रायगडच्या पालकमंत्रीपदावर. पण, आदिती तटकरे यांच्याकडे मंत्रिपद जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भरत गोगावलेंनी या पदावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली. त्यातच आता बोलताना गोगावलेंनी आदिती तटकरेंबद्दल एक विधान केलं.
वाचा >> एकनाथ शिंदेंचे खास, पण अजितदादांच्या एंट्रीनं होणार गेम, गादी जाणार?
गोगावले म्हणाले, “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं, तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण, त्यांच्या या विधानाने ते स्त्रियांना कमकुवत समजत असल्याची चर्चा सुरू झाली. यावरून रोहित पवारांनी त्यांना चांगलंच सुनावलं.










