भास्कर जाधवांना नारायण राणेंवरील टीका भोवणार? पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्यातल्या महाप्रबोधन यात्रेत केलेल्या भाषणाप्रकरणी आधीच गुन्हा दाखल झालेला असताना ठाकरे गटाचे उपनेते भास्कर जाधव यांच्याविरुद्ध पुन्हा एक तक्रार देण्यात आलीये. कुडाळ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एसीबी कारवाई विरोधात काढण्यात आलेल्या भाषणात जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली. त्यांच्या भाषणातील काही विधानांवर आक्षेप घेण्यात आलाय. तशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीये.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.

भास्कर जाधवांविरुद्ध देण्यात आलेल्या तक्रारीत भाजप कार्यकर्त्यांनी काय म्हटलंय?

भाजपच्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, तक्रारीत म्हटलंय की, ‘कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधात एसीबी कार्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. सदर मोर्चाच्या वेळी भाजप नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते करणार याची पूर्वकल्पना आल्याने आपणास कालच आम्ही त्यासंबंधी सूचना लेखी तक्रार अर्जाद्वारे दिलेली होती.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आजच्या मोर्चात भाषणं करताना भाजपा नेत्यांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह शिवराळ गलिच्छ भाषा वापरण्यात आलेली आहे. सदरची माहिती पोलिसांना आपल्या यंत्रणेद्वारे, तसेच मीडियावरून मिळाली असेलच. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भास्कर जाधव यांनी व्यासपीठावरून जाहीरपणे शिवीगाळ करत बदनामी करणारी आणि खालच्या दर्जाची अत्यंत आक्षेपार्ह अशी शिवराळ भाषा वापरली आहे’, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटलंय की, ‘या घृणास्पद प्रकारानं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधितांवर पोलिसांकडून होईलच, असा विश्वास देत त्यांना संयम राखण्याचे आवाहन पक्षनेत्यांनी केलं आहे. तरी, या प्रकरणाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणून त्वरित आमदार भास्कर जाधव यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दलच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल तातडीनं गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून सदर प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून, नारायण राणे यांच्याबद्दल कुडाळ येथे केलेलं वक्तव्य भास्कर जाधव यांच्या अंगलट येऊ शकत अशी चर्चा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झालीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT