Lok Sabha Elections: बारामतीवाल्यांना दुसरा वायनाड कुठे मिळणार?; राम शिंदेंनी सुप्रिया सुळेंना ललकारलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकसभेच्या निवडणुकांना अजून अवकाश असला, तरी भाजपनं मिशन 2024 हाती घेतलंय. देशातले १४४ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केलीये. भाजपच्या मिशन १४४ मध्ये महाराष्ट्रातले अनेक लोकसभा मतदारसंघ आहे. यात बारामतीचाही समावेश असून, भाजप तयारीला लागलीये. आता याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदेंनी मोठं विधान केलंय. बारामती जिंकायचीच असं म्हणताना बारामतीवाल्यांना दुसरा वायनाड कुठे मिळणार? असं म्हणत सुप्रिया सुळेंना आव्हान दिलंय.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात कमळ फुलवायचं, असा निर्धार भाजपनं केल्याचं दिसतंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यामुळे बारामतीवर भाजपनं लक्ष्य केंद्रीत केल्याचंही दिसतंय. आता याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राम शिंदेंनी अहमदनगरमध्ये एक विधान केलंय.

सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल राम शिंदे काय म्हणाले?

“ए फॉर अमेठी बी फॉर बारामती. 2014 ला हारलो आणि 2019 ला जिंकलो. 2019 मध्ये राहुल गांधींच्या लक्षात आलं की, आपलं काय अमेठीत खरं नाही. त्यामुळे केरळ मधल्या वायनाडचा शोध लावला. तिथे दुसरा फॉर्म भरला म्हणून राहुल गांधी संसदेत गेले. मी म्हटलं अमेठी वाल्याला वायनाड मिळाला, पण बारामती वाल्याला वायनाड २ कुठे मिळणार? कारण एकुणच पक्ष चार जिल्ह्यांत आहे”, असं म्हणत राम शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला उपहासात्मक टोला लगावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंडित दीनदयाळ व्याख्यान मालेत बोलताना राम शिंदेंनी अमेठी लोकसभा मतदारसंघाबद्दलचा अनुभव सांगितला. “पक्षाने पुन्हा एकदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्यापेक्षा मोठी जबाबदारी बारामतीचा लोकसभेचा प्रभारी म्हणून दिली. असा योगायोगच यावा लागतो”, असं शिंदे म्हणाल्या.

“देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यात होतो. दौरा असा झाला की, मागील अडीच वर्षाच्या कालखंडात विद्यमान खासदार (सुप्रिया सुळे) त्या मतदार संघात फिरल्या नाहीत. कुणाची विचारपूस केली नाही. कोविडमध्ये मदतीसाठी गेल्या नाहीत, पण निर्मला सीतारमन यायच्या म्हटल्यावर घरोघर फिरायला लागल्या”, असा टोला शिंदेंनी सुळेंना लगावला.

ADVERTISEMENT

“2014 ला आपण बारामतीत जिंकण्याच्या परिस्थितीत आलो. 2019 ला 80 हजार मतांची वाढ झाली, पण अमेठीबरोबरच का निकाल लागला नाही, असं प्रभारी झाल्यावर माझ्या मनात आलं. तिथे कार्यकर्त्यांना एक सांगितलं की, ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती. 2014 आणि 2019 हुकलं, पण 2024 ला नक्की करू”, असा निर्धार राम शिंदेंनी व्यक्त केला.

“मी 2014 ला अमेठीत युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष असताना गेलो होतो. माझ्यासोबत युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मृती इराणी होत्या. तेव्हा कुणी बोलावलं नव्हतं, पण हाडाचा कार्यकर्ता असल्यानं गेलो. स्मृती इराणी ओळखीच्या असल्यानं आपण जायला काय हरकत आहे? अमेठीत 2014 ला ती निवडणूक हरलो, पण 19 ला जिंकलो. मी लहानपणापासून बातम्या ऐकायचो अमेठी म्हटल की गांधी असं सूत्र होतं, पण तिथे देखील भाजपने बदल घडवला”, असं शिंदेंनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT