
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजेच CGST विभागात नागपूर येथे मुख्य आयुक्त पदावर कार्यकरत असलेल्या अशोक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागातील महिला अधिकाऱ्याने अशोक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक यांनी CGST विभागात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्यासोबत असभ्य वर्तन आणि लैंगिक शोषण केल्याची तक्रार करण्यात आली होती. संबंधित महिलेने अशोक यांच्याविरुद्ध विभागीय बोर्डामार्फत केंद्रीय अर्थमंत्रालयाला तक्रार दिली होती.
या तक्रारीची दखल घेत अर्थमंत्रालयाने मुख्य आयुक्त अशोक यांचं निलंबन केलं आहे. १३ मे रोजी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. या कारवाईमुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशोक यांचे खासगी सचिव सुशील कुमाप यांनीही निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.