Chinchwad bypoll : भाजपने तीन महिने…; सुनील शेळकेंच्या आरोपानं खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

sunil shelke serious allegations on bjp over chinchwad assembly by election 2023 : भाजपचे आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं निधन झाल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (chinchwad assembly bypoll) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू असून, बिनविरोध निवडणूक करण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. (Sunil Shelke on chinchwad assembly constituency by election 2023)

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवारी (30 जानेवारी) बैठक झाली. ही बैठक चिंचवड मतदारसंघातच झाली. राष्ट्रवादी काँग्रेसनं चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी आमदार सुनील शेळके यांच्यावर टाकली आहे. शेळके यांच्या उपस्थितीतच ही बैठक झाली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : सुनील शेळके भाजपबद्दल काय म्हणाले?

या बैठकीनंतर सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “पंढरपूर पोटनिवडणूक लागली, तेव्हा भाजपनं सहानुभूतीचा विचार केला नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा भाजपने तीन महिने आधीपासून चिंचवड पोटनिवडणूकीची तयार सुरू केली. अशा ठिकाणी सहानुभूतीचा विचार करावा का?”, असा प्रश्न आमदार शेळके यांनी उपस्थित करत भाजपवर खळबळजनक आरोप केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

By elections : लक्षात ठेवा! चिंचवड-कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख बदलली

पुढे आमदार शेळके म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी उमेदवारीसाठी दावा केला असला, तरी राष्ट्रवादीची ताकद चिंचवड मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीचा विचार करत असताना नक्कीच पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विचार करेल. राजकीय डाव म्हणून पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला जातो. पण आता पुरस्कृत करण्याची गरज नाही”, असं शेळके म्हणाले.

कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देऊनही भाजपनं विचार केला नाही -सुनील शेळके

पुढे बोलताना सुनील शेळके असंही म्हणाले की, “आमच्या सदस्यांचं निधन झालं होतं, तेव्हा भाजपनं मुंबईचा अपवाद वगळला, तर जवळपास तीन ठिकाणी… दोन ठिकाणी काँग्रेस, एका ठिकाणी राष्ट्रवादी. त्यावेळी यांनी कुठल्याही सहानुभूतीचा विचार केला नाही. त्यांनी उमेदवारी देण्याचं काम केलं. त्या व्यक्तीच्या कुटुंबीतील व्यक्तीला उमेदवारी दिली तरी तिथेही यांनी विचार केला नाही.”

ADVERTISEMENT

कसबा पोटनिवडणूक 2023 : पुन्हा कमळ फुलवण्यासाठी भाजपची ‘समिती’ रणनीती!

ADVERTISEMENT

“पिंपरी चिंचवड विधानसभेचा उल्लेख करायचा असेल, तर या विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे, याची रणनीती मागच्या तीन महिन्यापासून भाजप करत आहे. अशा वेळी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा का? हे देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे”, असं शेळके यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT