Chinchwad Bypolls: जिथे फडणवीसांची सभा, तिथूनच गेली पवार, जयंत पाटलांची रॅली

Abhinn Kumar

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

chinchwad bypolls 2023। Devendra Fadnavis। Ajit Pawar : चिंचवडमध्ये गुरुवारी (23 फेब्रुवारी) अजित पवार आणि जयंत पाटील यांचा रोड शो आणि सभा होती, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा सांगवी येथे आयोजित करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांची सभा ज्या मैदानावर होती, त्याच मैदानाच्या समोरून अजित पवार आणि जयंत पाटील यांची रॅली गेली.

अजित पवारांची रॅली गेल्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा स्थळी दाखल झाले. याच भागातून राहुल कलाटे यांची देखील रॅली गेल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्याचबरोबर दोन्ही रॅलीला वाट करून देताना पोलिसांची दमछाक झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आले आमनेसामने

याच भागामध्ये पिंपळे गुरव येथील लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयासमोरून अजित पवार यांची रॅली जात असताना भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना झेंडे दाखवण्यात आले. काही वेळात अजित पवार यांची रॅली पुढे गेली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

By Poll: ‘शिवसैनिकांनो काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मतदान करा’, ठाकरेंचा थेट आदेश

अखेरच्या टप्प्यात नेत्यांनी प्रचारात दिलं झोकून

निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. गेल्या काही दिवसांपासून चिंचवड मतदारसंघामध्ये मविआ आणि भाजपचे नेते प्रचारात हजेरी लावत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी रॅली काढली. त्याचबरोबर त्यांची जाहीर सभा पार पडली. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शरद पवारही उतरले प्रचारात

दुसरीकडे बुधवारी शरद पवार हे देखील चिंचवडच्या प्रचारात दाखल झाले होते. गुरुवारी अजित पवार , जयंत पाटील यांनी रॅली काढली. आमदार रोहित पवार यांनी देखील गुरुवारी कोपरा सभा आणि भेटीगाठी घेतल्या.

मतदानाला दोनच दिवस राहिल्याने प्रचाराचा धडाका लावण्यात आला. कोपरा सभा, रॅली, बड्या नेत्यांच्या सभा घेऊन ही निवडणूक महत्वाची करण्यात आली.

Uddhav Thackeray: ‘विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते’, ठाकरेंचं मोठं विधान

ठाकरेंसह काँग्रेस नेतेही प्रचारात

चिंचवडची जागा महाविकास आघाडी संयुक्तपणे लढत आहेत. चिंचवडमध्ये उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असला, तरी महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाचे नेतेही प्रचार करताना दिसले. आदित्य ठाकरेंसह काँग्रेसच्या नेत्यांच्या संयुक्त सभा चिंचवडमध्ये झाल्या. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने वर्चस्व पणाला लावल्याचं दिसत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT