Aurngabad : हॅलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतोय, जखमी वारकऱ्यासाठी थेट रूग्णालयात फोन

औरंगाबाद येथील महिला वारकऱ्यावर उपचारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला फोन, उपचारांचा खर्चही उचलला
CM Eknath Shinde Phone call in sigma Hospital Aurangabad For Injured Female warkari
CM Eknath Shinde Phone call in sigma Hospital Aurangabad For Injured Female warkari

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावला आहे. मग ते पूरस्थितीची पाहणी असो, दिल्ली दौऱ्याहून त्यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केलेला फोन असो. अशा सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. अशात औरंगाबादच्या रूग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या फोनचीही चर्चा आहे. एका महिला वारकऱ्याचा अपघात झाला. त्या महिला वारकऱ्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. ज्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात फोन केला.

CM Eknath Shinde Phone call in sigma Hospital Aurangabad For Injured Female warkari
Eknath Shinde : "देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून २०० आमदार निवडून आणणार''

काय घडली घटना?

औरंगाबाद (Aurangabad) येथील महिला वारकऱ्याचा पंढरपूरहून परतत असताना अपघात झाला. त्यावेळी या महिला वारकऱ्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. त्यामुळे या महिलेला चांगल्या रूग्णालयात दाखल करता येत नव्हतं. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने औरंगाबादच्या एका मोठ्या रूग्णालयात फोन केला आणि उपचारांचा खर्च स्वतः उचलत या महिला वारकऱ्यावर उपचार करण्यास सांगितलं.

यानंतर महिला वारकऱ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडिओ कॉलवर संवादही साधला. तसंच या महिला वारकऱ्याला काळजी घ्या आणि चिंता करू नका असंही सांगितलं. त्यामुळे या महिलेला दिलासा मिळाला आहे.

पैठण तालुक्यातील लाखेगाव या गावात राहणारी एक महिला आषाढीची पंढरपूर वारी करून परतत होती. त्याचवेळी या महिलेचा अपघात झाला. त्यानंतर या महिलेला सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या मोठ्या रूग्णालयात उपचार करणं शक्य नव्हतं. त्यामुळे गावातल्या काही लोकांनी या संबंधीची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांना दिली. त्यानंतर विनोद पाटील मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सरकारकडून काही मदत होऊ शकते का ही विचारणा केली.

CM Eknath Shinde Phone call in sigma Hospital Aurangabad For Injured Female warkari
Eknath Shinde : "वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, रेडा, कुत्रे म्हणायचं, आणि..."

या फोनची दखल घेत मंगेश चिवटे यांनी विनोद पाटील यांना तातडीने पुन्हा फोन केला. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बोलणं डॉक्टरांशी आणि महिला रूग्णाशी करून द्या असंही सांगितलं. डॉक्टरांशी बोलणं करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या महिला रूग्णावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसंच उपचारांचा सगळा खर्चही उचलत असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. महिला रूग्णाशी व्हीडिओ कॉलवरून संपर्क साधत काळजी घेण्याचंही आवाहन केलं.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर असताना हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही केला फोन

याआधी ९ जुलैला हिंगोली येथील आसना नदीला पूर आला. त्यामुळे कुरुंदा हे गाव पाण्याखाली गेलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. तसंच तिथल्या गावकऱ्यांना तातडीने मदत करा आणि योग्य त्या उपाय योजना करा असे निर्देश दिले. एवढंच नाही तर सर्व पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं आणि त्यांच्या जेवणाची तसंच मुक्कामाची व्यवस्था करा हे देखील सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाही त्यांनी महाराष्ट्रावर आलेल्या संकटाची कशी काळजी घेतली त्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता ही घटना घडली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in