Global Teacher रणजीत डिसले यांनी दिली राजीनाम्याची नोटीस, शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती

Global Teacher Ranjitsing Disle यांनी राजीनामा नेमका का दिला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
Global Teacher Ranjitsing Disle
Global Teacher Ranjitsing Disle फोटो-फेसबुक

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनाम्याची नोटीस दिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ७ जुलैलाच डिसले गुरूजींनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Global Teacher Ranjitsing Disle
अभिमानास्पद! Global Teacher डिसले गुरूजींची जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी नियुक्ती

ग्लोबल टीचर रणजीत दिसले यांचा राजीनामा सोलापूरच्या सीईओंकडे

रणजीत डिसले गुरूजी यांनी त्यांच्या राजीनाम्याचं पत्र माढा तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिलं आहे. त्यामध्येही राजीनाम्याचं कारण काय ते दिलेलं नाही. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डिसले यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही असंही समजतं आहे.

काही महिन्यांपूर्वी डिसले गुरुजी आणि शिक्षण विभागामध्ये वाद झाला होता. रणजित डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. त्यामुळे त्यांना अमेरिकेला जायचं होतं. त्यामध्ये शिक्षण विभागाच्या काही नियमांची आडकाठी येत होती. आता डिसले गुरुजींनी राजीनामा दिला तो या कारणामुळे आहे की आणखी काही कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.

डिसले गुरूजी यांनी व्हर्चुअल विज्ञान प्रयोग शिकवले. QR कोडेड पुस्तकांची संकल्पनाही त्यांनी मांडली. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमातून जगभरातील अशांत देशातल्या मुलांना एकत्र आणत त्यांच्या अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचं महत्त्वाचं काम रणजीत डिसले यांनी केलं. यानंतर ४ डिसेंबर २०२० ला डिसले गुरूजींना ग्लोबल टीचर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं.

कोण आहेत डिसले गुरूजी?

डिसले गुरूजी हे ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार विजेते आहेत

सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना सात कोटी रूपयांचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या संदर्भातली घोषणा केली होती

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचं रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे

या रकमेतून नऊ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जाईल असा त्यांचा मानस आहे.

काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?

- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप

- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर

- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली

- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत

- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार

- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in