यवतमाळ: प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू, कारचा टायर फुटल्याने दुर्घटना

निर्मल या ठिकाणी घडली दुर्घटना, टायर फुटल्याने अपघात
gynecologist and obstetrician dr surekha barlota lost her life in a car accident on nirmal to hyderabad road
gynecologist and obstetrician dr surekha barlota lost her life in a car accident on nirmal to hyderabad road

यवतमाळच्या प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. पियूष बरलोटाही होते. या दोघांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. डॉ. सुरेखा बरलोटा या यवतमाळच्या प्रसिद्ध स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. त्यात सुरेखा बरलोटा आणि डॉ. पियूष बरलोटा या दोघांचा मृत्यू झाला.

नेमकी काय घडली घटना?

डॉ. पियूष बरलोटा आणि डॉ. सुरेखा बरलोटा आणि त्यांच्या मित्राचं कुटुंब हैदराबाद येथून आलिशान कराने यवतमाळला परत येत होते. त्यावेळी निर्मल या ठिकाणापासून काही अंतरावत टोल नाक्याजवळ टायर फुटल्याने कारचा अपघात झाला. MH २९, बीपी ४२०० असा या कारचा नंबर होता. टायर फुटल्याने जो अपघात झाला त्या अपघातात डॉ. पियूष बरलोटा आणि डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला.

निर्मल या ठिकाणी अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी घेतली धाव

निर्मल या ठिकाणी अपघात घटनास्थळी धाव घेत जात जखमींना उपचारांसाठी रूग्णालयात हलवलं. पूजा पियूष बरलोटा (वय-१६), अतिथी (१८) आणि मीनल (वय-४०) यांच्यावर निर्मल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर पियूष बरलोटा यांनी फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच हैदराबाद डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. निर्मल येथील शासकीय रूग्णालयात डॉ. सुरेखा बरलोटा यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांचं पार्थिव यवतमाळमध्ये पोहचणार आहे.

डॉ. बरलोटा आणि त्यांच्या मित्रांचं कुटुंब यवतमाळला परत येत असतांना निर्मल ते हैद्राबाद मार्गावर टोल नाक्यानजीक निर्मलपासून १२ किमी अंतरावर त्यांच्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक फुटले. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर लोक धावले आणि त्यांनी जखमींना बाहेर काढून निर्मण येथील शासकीय रुग्णालयात पोहोचवलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in