
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल (HSC EXAM Results) कधी लागणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ८ जून म्हणजेच बुधवारी हा निकाल लागणार आहे. बुधवारी दुपारी १ वाजता हा निकाल लागणार आहे. वर्षा गायकवाड यांनी याची माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्याआधी कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने परीक्षा झाल्या नव्हत्या. यावर्षी कोरोना आटोक्यात आल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यानंतर कोरोना आटोक्यात आल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. आता यातल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे.
बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत झाल्या. राज्यातल्या १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता बुधवारी लागणाऱ्या निकालात कुठल्या जिल्ह्याचं वर्चस्व असणार? मुली बाजी मारणार का? या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच उद्या बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.