IT Raids : नागपुरात आयकर विभागाच्या धाडी! तीन मोठे उद्योग रडावर, कारण...

Income Tax Raids in Nagpur : आयकर विभागाच्या पथकांनी नागपुरातील तीन मोठ्या उद्योगांवर धाडी टाकल्या आहेत...
Income Tax department Raids in Nagpur
Income Tax department Raids in Nagpur

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये तीन मोठ्या उद्योगांवर आयकर विभागाच्या गुरूवारी धाडी पडल्या आहेत. तीन उद्योगांशी संबंधित १२ ठिकाणांनी धाडी टाकण्यात आल्या असून, तिन्ही उद्योगांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या धाडी टाकताना आयकर विभागाकडून गोपनीयता पाळण्यात आली होती.

नागपूरमधील विठोबा उद्योगासहित ३ मोठ्या उद्योगांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आलीये. गुरुवारी (३ नोव्हेंबर) रोजी सकाळी या धाडी टाकण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये असलेल्या या तिन्ही उद्योगांशी संबंधित १२ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. आयकर विभागाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने केली असून, सध्या तिन्ही कंपन्यांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचं समजते.

कोणत्याही ठिकाणी अशी कारवाई करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना सकाळीच हजर व्हायला सांगितलं जातं. मात्र, नागपुरातील कारवाईआधी आयकर विभागाने सकाळी ११ वाजता अधिकाऱ्यांच्या पथकाला ११ वाजता बोलावलं गेलं होतं, असं समजतं.

अघोषित संपत्ती उघड होण्याची शक्यता

नागपूरमध्ये गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच मोठ्या उद्योग समूहांवर धाडी पडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाची छापेमारी दोन दिवस चालणार आहे. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयकर विभागाच्या नागपुरातील तीन उद्योगांवर धाडी, काय घडलंय?

आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी पिनॅकल ग्रुपच्या ८ ठिकाणी, विठोबा ग्रुपच्या २ ठिकाणी आणि मगनमल हिरामल ग्रुपच्या २ ठिकाणांवर धाडी टाकल्या. पिनॅकल ग्रुप टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि मेसेजिंग सर्व्हिसेस क्षेत्रात कार्यरत आहे. उद्योग समूहाचे संचालक श्रीवास्तव आणि मुखर्जी आहे.

पिनॅकल ग्रुपचं कार्यालय गुडगावमध्ये आहे. त्याचबरोबर विठोबा ग्रुपच्या नागपूमधील एमआयडीसी स्थित असलेल्या फॅक्टरी आणि तीन पाटर्नसच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. विठोबा उद्योग समूहाला माल पुरवठा करणारी फर्म मगनमल हिरामलच्या घरासह आणि इतवारी स्थित असलेल्या दुकानावरही आयकर विभागाने छापेमारीची कारवाई सुरूच आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in