केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखी भर, आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या आहेत कारण तिच्या विरोधात आता अंबाजोगाईतही गुन्हा दाखल झाला आहे
केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखी भर, आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल
Ketki Chitale's problems Increased, now a one more case has been registered in Ambajogai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अंबाजोगाईत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मंगळवारी (दि.१७) सकाळीच राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी देखील चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

Ketki Chitale's problems Increased, now a one more case has been registered in Ambajogai
केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे यांनी फडणवीस-राज ठाकरेंचे का मानले जाहीर आभार?

सिनेअभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबद्दल दि . १३ मे रोजी बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता . ज्यात संत तुकाराम यांचा देखील उल्लेख करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून केतकी चितळेविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे .

काय आहे प्रकरण?

केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिला अटकही करण्यात आली आहे.

Ketki Chitale's problems Increased, now a one more case has been registered in Ambajogai
केतकी चितळेची एक पोस्ट अन् वातावरण तापलं, कोण-कोण काय बोललं?

केतकीने पोस्ट केलेली पोस्ट

"तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

पोस्टची पार्श्वभूमी काय?

मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.

या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे. आता या सगळ्या प्रकरणी तिच्यावर अंबाजोगाईमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in