मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटलांना वारकरी भवनावरुन शिंदे गटाने डिवचलं

ADVERTISEMENT

mns mla raju patil warkari bhawan dombivli shinde group provoke politics
mns mla raju patil warkari bhawan dombivli shinde group provoke politics
social share
google news

Latest Marathi News: डोंबिवली: कल्याण आणि डोंबिवली शहर सध्या राजकीय हॉटस्पॉट झाले आहेत. कधी भाजप-सेनेचा वाद तर कधी शिवसेना-मनसे मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. कल्याण ग्रामीण भागात आगरी-कोळी वारकरी भवन निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे येत्या 7 जूनला वारकरी भवनाच्या भूमीपूजनासाठी येणार आहेत. मात्र, त्याअगोदरच वारकरी भवनाभोवती राजकीय पिंगा सुरू झाला असून वास्तूच्या भूमीपूजनाआधीच फटाके उडालेत. (mns mla raju patil warkari bhawan dombivli shinde group provoke politics)

डोंबिवली (Dombivli) आणि दिव्याच्या मध्ये असणाऱ्या बेतवडे परिसरात हे भवन उभारले जाणार आहे. याबाबत शिंदे गटाच्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना टोला मारला. यावर गप्प बसेल ती मनसे कसली? पाटील यांनीही म्हात्रेंना जोरदार उत्तर दिलं आहे. म्हात्रेंनी ट्विटरवरून पाटलांवर टीका केली तर पाटील यांनीही टक्केवारीचा उल्लेख करत म्हात्रेंचा समाचार घेतला.

हे ही वाचा>> Cyclone Biperjoy : चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळणार, पण महाराष्ट्राला..

काय म्हणाले होते युवासेना सचिव दीपेश म्हात्रे

काही लोकांनी स्वखर्चातून आगरी-कोळी भवन बांधू अशी घोषणा केली होती. मात्र त्याचे कुठे काम सुरू असलेले दिसत नाही. खासदार शिंदे हवेत व ट्विटरवर आश्वासनं देत नाहीत ते प्रत्यक्षात काम करणारे आहेत. काही लोकांनी पोस्टर बॅनर रस्त्यावर आगरी-कोळी वारकरी भवन स्वखर्चातून बांधू असे बॅनर लावले होते. त्यांच्या खर्चाची काही तरतूद झालेली दिसत नाही. असं सांगत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mumbai politics : श्रीकांत शिंदे दारात जाऊन उद्धव ठाकरेंना देणार आव्हान!

आमदार राजू पाटील यांनी दिले उत्तर….

‘स्थानिक लोकप्रतिनिधीकडून सध्या नीच राजकारण सुरू आहे. मी माझ्या वडिलांच्या नावे वारकरी भवन बांधणार आहे तेही स्वखर्चातुन. त्यासाठी मी एक जागा देखील निवडली होती. मात्र संबंधित बिल्डरला धमकी देण्यात आली की तुझा प्रोजेक्ट पास होऊ दिला जाणार नाही असं पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे मी दुसरी जागा निवडली आणि तिथे वारकरी भवन उभारणार आहे. मुख्यमंत्री येत आहेत ,भूमिपूजन करणार आहे ही गोष्ट चांगलीच आहे. पण मी स्वखर्चातून उभारणार आहे मी टक्केवारीच्या पैशातून काम करणार नाही.’ अशी खरमरीत प्रतिक्रिया पाटलांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT