devagiri express robbery : 'देवगिरी एक्स्प्रेस'वर दरोडा! मध्यरात्री पोटूळजवळ काय घडलं?

पोटूळ रेल्वे स्थानकाजवळील घटना : रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास हल्ला; दरोडेखोरांकडून रुग्णवाहिकेचा वापर केला गेल्याची माहिती...
devagiri express robbery : 'देवगिरी एक्स्प्रेस'वर दरोडा! मध्यरात्री पोटूळजवळ काय घडलं?
Robbery in Devagiri Express at Potul station/AajTak(प्रातिनिधीक छायाचित्र)

सिंकदराबाद-मुंबईदरम्यान धावणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. दरोडेखोरांनी सिग्नलला कपडा बांधला होता. त्यामुळे एक्स्प्रेस थांबवली गेली आणि दरोडेखोरांनी चार ते पाच डब्यांवर तुफान दगडफेक केल्याची माहिती आहे.

सिंकदराबादवरून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दौलताबाद पोटुळ रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. दरोडेखोरांनी या दोन स्थानकांदरम्यान सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबवली.

सिंकदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस थांबल्यानंतर आरोपींनी गाडीच्या ५ ते ९ क्रमांकांच्या डब्यावर तुफान दगडफेक केल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. ८ ते १० जणांच्या टोळीने देवगिरी एक्स्प्रेस दरोडा टाकला असून, दागिने पळवल्याची माहिती आहे.

झालेल्या हल्ल्यानंतर देवगिरी एक्स्प्रेस पोटुळ स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतर शिलेगाव येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अचानक एक्स्प्रेसवर दगडफेक सुरू झाल्याने प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यानंतर सर्वच प्रवांशी डब्ब्यांच्या दारं खिडक्या बंद केल्या.

पोटूळ स्थानकावर दाखल झालेले पोलीस कर्मचारी.
पोटूळ स्थानकावर दाखल झालेले पोलीस कर्मचारी.

मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून, घटनास्थळी पोलिसांना एक रुग्णवाहिका आढळून आली आहे. त्यामुळे दरोडेखोरांकडून रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी असून, तब्बल तासभर देवगिरी एक्स्प्रेस घटनास्थळावर उभी होती अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

या घटनेसंदर्भात औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी 'मुंबई Tak'शी बोलताना सांगितलं की, मनमाडमध्ये पोलिसांनी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने रात्री उशिरा मनमाड रेल्वे स्थानकावर तक्रार दिली. गळ्यातील सोन्याची साखळी चोरल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवगिरी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली असून, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे," असं पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.