'मोदीजी, राजीनामा घेऊन नारायण राणेंना मोकळं सोडा'; अरविंद सावंतांनी मागणी करत काय दिला इशारा?

प्रभादेवी परिसरात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली, या भेटीनंतर राणेंनी शिवसेनेला गर्भित इशारा दिला होता
'मोदीजी, राजीनामा घेऊन नारायण राणेंना मोकळं सोडा'; अरविंद सावंतांनी मागणी करत काय दिला इशारा?

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असा संघर्ष होताना दिसतोय. प्रभादेवी परिसरात दोन्ही गट आमने सामने आले आणि राडा झाला. राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला. त्यावरून शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे राणेंचा राजीनामा घेण्याची मागणी करत शिवसेना काय हे समजावून सांगू, असा पलटवार केला आहे.

सदा सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला. मुंबई, महाराष्ट्रात चालणं फिरणं अवघड होईल असं राणे म्हणाले होते.

नारायण राणे यांचा इशारा; अरविंद सावंत काय म्हणाले?

नारायण राणे यांनी केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. सावंत यांनी ट्विट केले आहे.

"शिवसेना संपली... आहे कुठे? असे आजवर गिनीज बुकमध्ये नोंद करावी लागेल इतक्या वेळा नारायण राणे बोलले आहेत. त्यांचा शिवसेनेने त्यांच्या घरात आणि मुंबईतही पराभव केला आणि शिवसेना काय आहे हे दाखवून दिले आहे. तेव्हा हेच सरवणकर त्यांच्यासोबत होते", अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

'मोदीजी, राजीनामा घेऊन नारायण राणेंना मोकळं सोडा'; अरविंद सावंतांनी मागणी करत काय दिला इशारा?
...तर महाराष्ट्रात फिरण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, नारायण राणेंचा धमकीवजा इशारा

नारायण राणेंना मोकळे सोडा; मोदींकडे सावंतांनी काय केली मागणी?

राणेंबद्दल बोलताना अरविंद सावंत म्हणाले, "राणे कधी एका ठिकाणी टिकले नाही, तर त्यांचा विचार कसा टिकेल? ही माणसं विचारपूस करायला जातात, याचा अर्थ नक्कीच समोरचा दुःखात किंवा अडचणीत आहे. केंद्रीय मंत्रीच जर अशा धमक्या देत फिरत असेल तर आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी त्यांचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहिजे", अशी मागणी अरविंद सावंत यांनी मोदींकडे केलीये.

राणेंना शिवसैनिक शिवसेना समजावून सांगेल- अरविंद सावंत

"ती झेड वा झेड+ सुरक्षा बाजूला ठेवून मोकळे फिरू द्या. एखाद्या शिवसैनिकासोबत चर्चा केल्यास तो देखील त्यांना शिवसेना समजावून सांगेल. कुणाच्या तरी आश्रयावर जगणाऱ्यांनी फुशारक्या मारू नयेत", असं म्हणत अरविंद सावंत यांनी नारायण राणेंना इशारा दिला आहे.

नारायण राणे नक्की काय म्हणाले होते?

आमदार सरवणकर यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे म्हणाले होते की, ''शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. ‘मातोश्री’च्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू आहे. सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमची युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका, नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघड होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल", इशारा राणेंनी दिला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in