बॉम्बे हायकोर्टाकडून अर्बन नक्षलवाद प्रकरणात आनंद तेलतुंबडेंना जामीन मंजूर

अर्बन नक्षलवाद प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर
Prof Anand Teltumbde has been granted bail by the Bombay high court
Prof Anand Teltumbde has been granted bail by the Bombay high court

बॉम्बे हायकोर्टाने आनंद तेलतुंबडे यांना अर्बन नक्षलवाद प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र एनआयएने या निकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायची संमती मागितली आहे. त्यामुळे हायकोर्टाने जामिनाच्या निकालाला आठवडाभर स्थगिती दिली आहे.

आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगाव प्रकरणातले आरोपी आनंद तेलतुंबडे यांना बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात एनआयएकडून दाद मागण्यात आली आहे. त्यामुळे जामिनाच्या आदेशाला आठवडाभर स्थगिती देण्यात आली आहे.

एप्रिल २०२० मध्ये आनंद तेलतुंबडेंना करण्यात आली अटक

एप्रिल २०२० मध्ये आनंद तेलतुंबडे यांना शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक करण्यात आली होती. आनंद तेलतुंबडे हे सध्या नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारला त्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी मागच्या वर्षी हायकोर्टात धाव घेतली होती. ३२ डिसेंबर २०१७ ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात आपण उपस्थित नव्हतो आणि कुठलंही भडकाऊ भाषण केलं नाही असंही त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं होतं.

NIA च्या विनंतीनंतर जामिनाच्या निर्णयाला सात दिवसांची स्थगिती

विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनाची मागणी केली होती. २१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेला आपण अनुपस्थित होतो. त्यामुळे चिथावणीखोर भाषण देण्याचा आणि या प्रकरणाचा आपल्याशी काही संबंध नाही, असा दावा तेलतुंबडे यांनी जामिनाची मागणी करताना केला होता. तर तेलतुंबडे हे एल्गार परिषद आयोजित करणाऱ्यांपैकी एक होते. शिवाय ते सीपीआय (माओवादी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत, असा दावा एनआयएतर्फे वकील संदेश पाटील यांनी तेलतुंबडे यांच्या जामिनाला विरोध करताना केला होता.

१ जानेवारी २०१८ ला काय घडलं होतं?

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in