
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून चर्चेत आले ते एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात वानखेडेंनी आर्यन खानला केलेली अटक आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी या सर्वात जास्त चर्चेत होत्या. मात्र यानंतर समीर वानखेंडेवर जे आरोप झालेले त्याची पडताळणी करण्यासाठी एनसीबीने एक समिती नेमली होती. पडताळणी समितीने नुकताच आपला रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये समीर वानखेडेंवर काय टीपणी करण्यात आली आहे हे. इंडिया टुडेच्या हाती लागलं आहे...
तर पाहूया पडताळणी समितीने नेमकं या रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे
विशेष पडताळणी समितीने समीर वानखेडेंची २ वेळा चौकशी केली.
यात समोर आलेल्या गोष्टी याप्रमाणे आहेत
समीर वानखेंडेंनी आपल्या कुटुंबीयांसोबत मालदीवला ट्रीपला जाण्यासाठी विरल राजन या व्यक्तीकडून ५ लाख ५९ हजार रूपये कर्ज घेतलं होतं. समीर वानखेडे मालदीवला ताज एक्झॉटिका या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले होते. या ट्रीपदरम्यान त्यांनी सव्वा लाख रूपये खर्च केले असं त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले.
एसईटीच्या अधिकाऱ्यांनी समीर वानखेंडेंना याबाबत विचारले असता त्यांनी हे कर्ज मी विरल राजनला परत करत असल्याचं सांगितलं. पण अधिकाऱ्यांना ही बाब यावेळी लक्षात आली की नवाब मलिक यांनी या कर्जाबद्दलची माहिती माध्यमांसमोर उघड केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून समीर वानखेडेंनी हे कर्ज परत करण्यास सांगितलं
मुद्दा दुसरा
विरल राजनने चौकशीदरम्यान हे मान्य केलं की समीर वानखेडेंकडून त्याने ४ महागडी घड्याळं विकत घेतली
ती अनुक्रमे अशी
कार्टीअर – जे १० लाख ६० हजार किमतीचं आहे आणि ते वानखेडेंकडून विरल राजनने ६ लाख ४० हजार रूपयांना विकत घेतलं
टॅगह्युअर – जे १ लाख ६८ हजार किमतीचं आहे आणि ते वानखेडेंकडून विरल राजनने ४० हजार रूपयांना विकत घेतलं
टॅगह्युअर – जे १ लाख १० हजार किमतीचं आहे आणि ते वानखेडेंकडून विरल राजनने ३० हजार रूपयांना विकत घेतलं
ओमेगा - जे १ लाख किमतीचं आहे आणि ते वानखेडेंकडून विरल राजनने ३० हजार रूपयांना विकत घेतलं
समीर वानखेडेंकडे असलेल्या या चारही महागडी घड्याळांची एकूण किंमत आहे – १४ लाख १८ हजार रूपये
आणि विरल राजनने समीर वानखेडेंकडून ही १४ लाख १८ हजार रूपयांची महागडी घड्याळं ७ लाख ४० हजार रूपयांना विकत घेतली
विरल राजनने हे ७ लाख ४० हजार रूपये चेकद्वारे दिले आणि हा चेक समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांच्या नावाने हा चेक देण्यात आला..
पडताळणी समितीला या चौकशीत समीर वानखेडेंकडे १७ लाख ४० हजार रूपये किमतीचं महागडं रोलेक्स घड्याळ मिळालं. समीर वानखेडेंनी या रोलेक्स घड्याळाबाबत एनसीबीला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती.
यावर समीर वानखेडेंना प्रश्न विचारला असता हे घड्याळ मला माझ्या बायकोने गिफ्ट दिलं असल्याचं सांगितलं
नवाब मलिक यांनी आपल्या आरोपात समीर वानखेडे ब्रँण्डेड वस्तू, ब्रॅण्डेड कपडे घालतात असं म्हटलं होतं. मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेंडेना विचारले असता ब्रँण्डेड कपडे घालणं चुकीचं नाही आणि हा कोणताही भ्रष्टाचार नाही असं म्हटलं
पडताळणी समितीच्या रिपोर्टमध्ये समीर वानखेडेंबाबत असंही नोंदवण्यात आलं आहे की समीर वानखेडेंकडे त्यांच्या इन्कम सोर्सपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे.
समीर वानखेडेंची बायको क्रांती रेडकर यांच्या गेल्या ३ वर्षांच्या इन्कम टॅक्स विवरण पत्रात त्यांचं नेट इन्कम २१ लाख रूपये आहे
तसंच समीर वानखेडेंच्या गेल्या ३ वर्षांच्या इन्कम टॅक्स विवरण पत्रात त्यांचं नेट इन्कम ३४ लाख रूपये आहे.
तसंच याच ३ वर्षाच्या काळात समीर वानखेडे आणि त्यांची बायको क्रांती रेडकर २ वेळा परदेशात गेले होते. या २ परदेश दौऱ्याची माहिती समीर वानखेडेंनी एनसीबीला दिली नव्हती..
या दोन परदेश प्रवासात त्यांनी २९ लाख ७५ हजार रूपये खर्च केले आणि याच काळात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर या दोघांचं मिळून उत्तपन्न होतं ४५ लाख रूपये.
याचबरोबर चौकशी समितीला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपासात खूप साऱ्या त्रूटी आढळून आल्या. तसंच समीर वानखेडेंवर प्रमुख आरोप असलेल्या बोगस प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी मिळवण्याचा तसेच नवीमुंबईतील बारच्या परमिट लायन्ससंदर्भातही चौकशी सुरूच आहे.. त्यामुळे पडताळणी समितीच्या रिपोर्टमध्ये समीर वानखेडेंबाबत या गोष्टी समोर आल्या आहेत...