Heavy Rain alert in Maharashtra : राज्यात पावसाचा धुमाकूळ! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

IMD issues heavy rain alert in Maharashtra : मुंबई, पुणे, नाशिकसह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
IMD issues heavy rain alert in Maharashtra। महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
IMD issues heavy rain alert in Maharashtra। महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

संपूर्ण जून महिन्यात दडी मारून बसलेला मान्सून अखेर आला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने मुक्काम ठोकला असून, पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यात धुमाकूळ घालणार असाच अंदाज हवामाने विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय. (IMD issued heavy rainfall alert for Maharashtra for the next four days)

गायब झालेल्या पावसाने जुलै उजाडताच राज्यात पाऊल ठेवलं. मागील दोन दिवसांपासून मुंबई, कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला असून, नद्या, नाले खळाळून वाहू लागले आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखंड पाऊस सुरू असून, पुढील काही दिवस जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

IMD issued a heavy rainfall alert for Maharashtra for the next four days
IMD issued a heavy rainfall alert for Maharashtra for the next four days

कोकणाला लागून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीपात्रात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढला आहे. पंचगंगेची पाणीपातळी इशारा पातळीकडे झेपावू लागली आहे. पुढील दोन तीन दिवस पावसाची संततधार कायम राहिल्यास कोल्हापुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

IMD issues heavy rain alert in Maharashtra। महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Rain Live updates : निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सिंदुदुर्गमध्ये 27 गावांचा संपर्क तुटला

पाच जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाकडून पुढील चार दिवसांच्या हवामानाचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. माहितीप्रमाणे कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ६, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

 ‘yellow alert’ for north Konkan, north central and south central Maharashtra and Marathwada regions
‘yellow alert’ for north Konkan, north central and south central Maharashtra and Marathwada regions

त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यातही ६, ७ आणि ८ जुलैला अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं तसंच मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क करण्याचं आवाहन केलंय.

याशिवाय पालघर जिल्ह्यात ८ जुलै रोजी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे.
IMD issues heavy rain alert in Maharashtra। महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं धुमशान! 4 नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, परशुराम घाट बंदच

सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामाने विभागाने मुंबईसह आजूबाजूच्या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ६ ते ९ जुलै या कालावधीत सहा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

IMD issued an ‘orange alert’ for mumbai, pune and south Konkan region
IMD issued an ‘orange alert’ for mumbai, pune and south Konkan region
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुण्यासह पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत ९ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in