Aryan Khan ला कोर्टाचा मोठा दिलासा, जप्त केलेला पासपोर्ट परत देण्याचे NCB ला निर्देश

आर्यन खानला ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती, मात्र त्याला या प्रकरणात क्लिन चिट देण्यात आली आहे
Mumbai Court Allows Aryan Khan Plea Seeking Return of His Passport in Cordilia Cruise Drugs Case
Mumbai Court Allows Aryan Khan Plea Seeking Return of His Passport in Cordilia Cruise Drugs Case (फाइल फोटो)

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळालेल्या आर्यन खानला आता त्याचा जप्त करण्यात आलेला पासपोर्ट परत दिला जावा हे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने एनसीबीला दिले आहेत. किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने ३० जूनला विशेष एनडीपीएस कोर्टात पासपोर्ट परत मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर देण्याचे निर्देश दिले.

Mumbai Court Allows Aryan Khan Plea Seeking Return of His Passport in Cordilia Cruise Drugs Case
शाहरुखच्या गैरहजेरीत आर्यन खान आयपीएल लिलावात; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आता आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. एनसीबीनं जप्त केलेला पासपोर्ट आर्यन खानला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात एनसीबीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आर्यन खानला अटक केली होती.

Mumbai Court Allows Aryan Khan Plea Seeking Return of His Passport in Cordilia Cruise Drugs Case
आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?

एनसीबीचे वादग्रस्त ठरलेले अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई त्यावेळी केली होती. त्यावेळी समीर वानखेडे यांनी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट तसंच मुनमुन धमेचा या तिघांसह एकूण २० जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानला २५ दिवसांहून अधिक काळ तुरुंगात रहावं लागलं होतं. यानंतर आर्यन खानला जामीनही मिळाला तसंच या प्रकरणात त्याला क्लिन चीटही मिळाली.

काय आहे प्रकरण?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव आहे असं सांगितलं.

तसंच या प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल, के. पी. गोसावी, मिलिंद भानुशाली यांच्याकडून समोर आलेल्या गोष्टी या वेगळंच कथन करत होत्या. प्रभाकर साईलने खंडणीसाठी आर्यन खानला अडकवल्याचा आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर कऱण्यात आला. तसंच मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. या सगळ्यानंतर समीर वानखेडे यांच्याकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in