Mumbai Local : घसरलेली लोकल रूळावर, लवकरच हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून वाहतूक सुरू झाली आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे
Mumbai local Derailment at CSMT Now Harbour Line is working, PRO Shivaji Sutar gave Update Information
Mumbai local Derailment at CSMT Now Harbour Line is working, PRO Shivaji Sutar gave Update Information

मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकात लोकलचा छोटा अपघात आज सकाळी झाला होता. त्यानंतर हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती वाहतूक आता सुरळीत येण्यास सुरूवात झाली आहे. दुपारी १२.१५ च्या सुमारास जी लोकल घसरली ती रवाना झाली आहे. आज सकाळच्या सुमारास जो अपघात झाला होता त्यामुळे हार्बर मार्गावरची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र आता ही सेवा सुरळीत व्हायची सुरूवात झाली आहे.

सीएसटीएम स्थानकावर नेमकी काय घडली होती घटना?

मंगळवारी सकाळी सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर १ वर आलेली लोकल ही बंपरला धडकली. ही लोकल मागे घेत असताना हा अपघात सकाळी ९ च्या सुमारास झाला. सिग्नल दिल्यानंतर ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेली. त्यानंतर ट्रेनचे दोन डबे रूळांवर खाली घसरून एका बाजूला कलंडले. काही डबे प्लॅटफॉर्मलाही धडकले. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच्या लाद्याही तुटल्या.

csmt स्थानकात सकाळी झालेल्या या अपघातामुळे हार्बर रेल्वे मार्गावरची सेवा विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र दुपारी १२.१५ पासून ही सेवा सुरळीत सुरू झाली आहे. सुमारे तीन तास या ठिकाणी दुरूस्तीचं काम सुरू होतं.

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात अपघात नेमका कसा झाला?

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात अपघात नेमका कसा झाला? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. हार्बर मार्गासाठी अप आणि डाऊनचे दोन फलाट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर हा अपघात झाल्याने सुमारे तीन तास एकच फलाट वाहतुकीसाठी उपलब्ध होता. आता हळूहळू ही वाहतूक पूर्वपदावर येते आहे.

मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार रूळावरून घसरलेला कोच रूळावर आणायचं काम पूर्ण झालं आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून वाहतूक सुरू झाली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. त्यामुळे लोकलचे डबा रुळावरुन घसरला. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा डबा रुळावरुन घसरला होता. सर्व प्रकारच्या यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अवघ्या तीन तासांत रुळावरुन घसरलेली लोकल पनवेलच्या दिशेनं रवाना झाली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in