"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही"; ईडीच्या नोटीसनंतर राऊतांनी थोपटले दंड

Ed Summons to Sanjay Raut : पत्रा चाळ प्रकरणात ईडीने बजावलं समन्स
"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही"; ईडीच्या नोटीसनंतर राऊतांनी थोपटले दंड

शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहे. शिवसेनेत उफाळून आलेली बंडखोरी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना आता खासदार संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. संजय राऊत यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

गोरेगावमधील पत्रा चाळ भूखंड (Patra Chawl case) प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांना समन्स बजावलं गेलं आहे. संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर राऊत ईडीच्या कार्यालयात जाणार का? हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल.

दरम्यान, ईडीने नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलं आहे. राऊत यांनी थेट अटक करा असं आव्हानच दिलं आहे. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या... मला अटक करा. जय महाराष्ट्र," असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी 3,000 अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिष फ्लॅटकडे राहणार होते.

दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही"; ईडीच्या नोटीसनंतर राऊतांनी थोपटले दंड
Deepak Kesarkar : बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊत यांना शिवसेनेतून हाकलून दिलं असतं

ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचा एक संचालक होते. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊत यांना EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवन अटकेत होता. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOW ने अटक केली होती तर सारंग वाधवानला EOW ने त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये EOW ने अटक केली होती. त्यानंतर राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत आणि त्यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या निवासस्थानांसह सुमारे सात ठिकाणी झडती घेतली. राऊत यांना 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर पाटकरांचा जबाब ईडीने नोंदवला होता. राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचे नावही समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते, ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला होता. त्यानंतर ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाब नोंदवले.

"माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही"; ईडीच्या नोटीसनंतर राऊतांनी थोपटले दंड
Sanjay Raut : नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंचं, बंडखोर आमदारांवर टीकास्त्र

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 मध्ये प्रवीण राऊत यांना त्याच्या बँक खात्यात इक्विटी आणि जमीन व्यवहाराच्या नावाखाली 95 कोटी रुपये मिळाले होते तरीही कंपनी प्रकल्प पूर्ण करू शकली नाही आणि कोणतेही उत्पन्न मिळाले नाही.

या प्रकरणात ईडीने ज्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली ते सुजित पाटकर हे प्रवीण राऊत यांचा सहकारी आणि संजय राऊत यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. पाटकर हे संजय राऊत यांच्या मुलींसह वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये गेल्या वर्षभरापासून भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने यापूर्वी अलिबाग येथे संयुक्तपणे जमीन खरेदी केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in