एकनाथ शिंदेंसह बंडखोर मंत्र्यांना ठाकरेंचा झटका; कोणत्या मंत्र्यांचं खातं कुणाकडे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झटका दिलाय. सध्या गुवाहाटीत असलेल्या शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार कामं अडकून पडू नये, ती सुरळीतपणे पार पडावी म्हणून पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

सरकारने काय म्हटलंय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे, त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘३८ आमदारांनी पाठिंबा काढला, ठाकरे सरकार अल्पमतात’; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच खळबळ

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंसह कॅबिनेट मंत्र्याकडील खातेवाटपात बदल

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहेत. तर गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खातं अनिल परब यांच्याकडे दिलं गेलं आहे.

दादाजी भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते आणि संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर गडाख यांच्याकडे दिलं गेलं आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खातं आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ‘बंड’ सर्वोच्च न्यायालयात! आज सुनावणी

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल

शंभूराज देसाई यांच्याकडील खाती वेगवेगळ्या मंत्र्यांकडे दिली गेली आहेत. यात गृह राज्यमंत्री खातं संजय बाबुराव बनसोडे यांच्याकडे, विश्वजित पतंगराव कदम यांच्याकडे राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन ही खाती दिली आहेत. तर सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क हे खातं दिलं गेलं आहे.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडील खातीही वेगवेगळ्या मंत्र्यांकडे दिलीये. विश्वजित पतंगराव कदम यांच्याकडे राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे यांच्याकडे राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन) तर आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) पदभार सोपवण्यात आला आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील महसूल राज्यमंत्री पदाचा कार्यभार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) असा फेरबदल करण्यात आला आहे.

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्याकडील खातीही वेगवेगळ्या मंत्र्यांकडे दिली गेली आहे. यात आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे यांच्याकडे राज्यमंत्री (महिला व बाल विकास), तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) कार्यभार दिला गेला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT