Chitra Wagh : "संजय राठोडांविरुद्धचा कायदेशीर लढा सुरूच राहिल"

Chitra Wagh : पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने २०२१ मध्ये आत्महत्या केली, या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचे आरोप झाले त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता
My legal fight against Sanjay Rathore will continue Says Chitra Wagh
My legal fight against Sanjay Rathore will continue Says Chitra Wagh

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्रित येत, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. तर शिवसेनेच्या काही बंडखोर आमदारांवर महिलावरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असणाऱ्या संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणानंतर प्रश्न उपस्थित होते. त्यांच्याविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे.

आता भाजप सोबत गेल्याने त्यांच्यावर भाजपमधील नेते मंडळी आरोप करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना. पुणे जिल्ह्यातील थेउर येथील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत संवाद साधला.

संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे.त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की,आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा,मी माझी लढाई अजून ही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोड यांना क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. माझा हा लढा चालूच राहणार आहे.अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, रघुनाथ कुचिक यांनी अटी आणि शर्थींचा भंग करून देखील, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्या बाबत देखील माझा लढा सुरू असून त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही. तसेच औरंगाबाद येथील घटनेतील तरुणीला देखील न्याय मिळाला नाही. त्याबाबत देखील माहिती राज्यातील जनतेसमोर येईल,अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

काय आहे प्रकरण?

७ फेब्रुवारी २०२१ ला पुण्यात २१ वर्षीय पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. या प्रकरणात पूजा चव्हाणच्या काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप व्हायरल एक आवाज हा संजय राठोड यांच्याशी मिळताजुळता असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली. याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर जेव्हा भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत असतान देखील संजय राठोड हे समोर आले नव्हेत. तब्बल 15 दिवसानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी आपली बाजू मांडली होती.

महाविकास आघाडी सरकार आता राज्यात नाही. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. तसंच शिवसेनेच्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यात संजय राठोडही आहेत. ते या आमदारांमध्ये असले तरीही कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीर केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in