Nagpur Crime News : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. चारित्र्यावरील संशयातून बापाने क्रूर कृत्ये केलंय. शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा वाद झाला अन् संतापाच्या भरात दोन दिवसापूर्वी जन्माला आलेल्या बाळाला धरून जमिनीवर आदळलं.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत निर्दयी बापाने दोन दिवसापूर्वी जन्माला आलेला बाळाला रुग्णलयातील फरशीवर आपटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली आहे.
सध्या त्या दोन दिवसांच्या चिमुकल्यावर मेडिकल तथा शासकीय रुग्णलयात उपचार सुरू आहे. गिरीश गोंडाणे असं निर्दयी बापाचे नाव असून तो मुळचा अमरावती जिल्ह्यातील सावर्डी येथील रहिवासी आहे.
आरोपी गिरीश आणि प्रतीक्षा हे दोघेही एकाच गावात राहत होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर दोघांनी प्रेमविवाह केला. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात भांडणानं शिरकाव केला.
गिरीश आणि प्रतीक्षाच्या आयुष्यात संशयाचं भूत शिरलं. त्यानंतर तिला गिरीशने मारहाण सुरू केली. दरम्यान, प्रतीक्षा गर्भवती राहिली. अमरावती येथून तिला उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले.
31 डिसेंबरच्या रात्री साडे सहा वाजताच्या सुमारास रुग्णालयामध्ये प्रतीक्षाने बाळाला जन्म दिला. तिला वार्डात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, गिरीश प्रतीक्षा असलेल्या वार्डात गेला. तिथे त्याने पत्नी प्रतीक्षासोबत वाद घातला. शिविगाळ केली. त्यानंतर त्याने रागाचा भरात त्या दोन दिवसाच्या बाळाला फरशीवर फेकले. यात प्रकृती गंभीर झाली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.