जामीनासाठी धडपडणाऱ्या नबाव मलिकांच्या अडचणीत भर, वाशिम कोर्टाने काय दिले निर्देश?

Nawab Malik Vs Sameer Wankhede : नवाब मलिक अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात अडकणार?
nawab malik
nawab malik(फाइल फोटो)

मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडेंशी संबंधित प्रकरणात मलिकांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासह चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश वाशिम सत्र न्यायालयाने पोलिसांना दिलेत.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं शाब्दिक युद्ध रंगलं होतं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचाही आरोप केला होता.

समीर वानखेडे हे मुस्लीम असून, त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. या प्रकरणात नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

nawab malik
Nawab Malik यांच्यावर वानखेडेंनी टाकलेली डिफेमेशन केस म्हणजे काय? अब्रुनुकसानीचा दावा कधी करता येतो? समजून घ्या

जातीवाचक विधानांवर बोट ठेवत समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. मलिकांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केली होती. त्याचबरोबर समीर वानखेडे यांनीही मलिकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं. त्यांनी वाशिम न्यायालयात धाव घेतली होती.

वाशिम सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. देशपांडे यांच्या पीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सदरील प्रकरणात गुन्हा दाखल करून या चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

nawab malik
Nawab Malik: 70 हजाराचा शर्ट, 2 लाखांचे बूट.. सगळं आलं कुठून?, मलिकांचे समीर वानखेडेंवर नवे गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते नवाल मलिक सध्या तुरुंगात असून, जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जामीनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवलेला असतानाच आता मलिकांविरुद्ध नवी प्रकरण उभं राहताना दिसत आहे. त्यामुळे समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या मलिकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in