"मोदी म्हणाले अजितदादांना बोलू द्या, पण..." वाचा देहूतल्या कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं?

भाषणादरम्यान नरेंद्र मोदी संत तुकारामांचे अभंग म्हणाले. यावेळी त्यांनी पालखी मार्गाचा आवार्जून उल्लेख केला.
"मोदी म्हणाले अजितदादांना बोलू द्या, पण..." वाचा देहूतल्या कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं?
Narendra Modi Pune TourMumbai Tak

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी राज्यभरातून वारकरी उपस्थीत होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थीत होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते परंतु सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला परंतु अजित पवार तुम्ही बोेला म्हणाले. आता अजित पवारांना भाषण का करु दिले नाही याची चर्चा रंगली आहे.

भाषणादरम्यान नरेंद्र मोदी संत तुकारामांचे अभंग म्हणाले. यावेळी त्यांनी पालखी मार्गाचा आवार्जून उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली. पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात पुर्ण होईल. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी ३५० किलोमीटर असेल. त्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. देशात सरकारी योजनेचा लाभ सर्वांना सारखा मिळत आहे, त्यात कसलाही भेदभाव केला जात नाही असेही मोदी यावेळी म्हणाले.

देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही मोठा करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानले. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा मला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना जाते. भारत देश हा शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात अभंगाने केली. यादव साम्राज्य संपल्यानंतर समाज छिन्नविछिन्न झाला होता, अंधश्रद्धा वाढीला लागली होती. तेव्हा महाराष्ट्रातील संतांनी समाजाला जागृत करण्याचं काम केले. अंधश्रद्धेपासून दूर राहणारा समाज संत तुकारामांनी निर्माण केला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in