‘महाराष्ट्र-कर्नाटकाच्या राज्यपालांमध्ये काय बोलणं झालं?’ सतेज पाटलांनी उपस्थित केली शंका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांमध्ये कोल्हापुरात बैठक झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शंका व्यक्त केलीये.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना मारहाण झाल्याची घटना घडल्या असून, याविरोधात महाराष्ट्रातून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यपालांची बैठक कोल्हापुरात झाल्याचा मुद्दा मांडत प्रश्न उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं काम केलंय पठ्ठ्यांनी, कर्नाटकला ‘असा’ शिकवलाय धडा!

बैठकीत सतेज पाटील म्हणाले, “मराठी भाषिकांच्या वाहनांवर हल्ले करणे, मराठी भाषिक नागरिकांना मारहाण करणे घटना अशा वारंवार घडत आहेत. मंगळवारी कन्नड वेदिका रक्षकच्या गुंडांनी मराठी भाषिक वाहनांवर हल्ले केले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषिकांच्यावर अन्याय करण्याचं हे राजकीय षडयंत्र कर्नाटकात सुरू आहे.”

ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : 10 डिसेंबरला कोल्हापुरात आंदोलन

सीमाभागातील मराठी भाषिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने 10 डिसेंबरला कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ADVERTISEMENT

सीमावाद: ‘म्हणून आम्ही कर्नाटकात गेलो नाही..’, शंभूराज देसाईंनी सांगितलं खरं कारण

आंदोलन ही सुरुवात असून, यापुढे कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवरील अन्याय थांबविला नाही तर जशास तसे उत्तर दिलं जाईल, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

“आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगांव, कारवार, बिदर या भागातील सुमारे २५ विधानसभा मतदारसंघातील कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेवून मुद्दामहून मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई करत आहेत”, असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

‘कोल्हापुरात कर्नाटक भवन उभारणार’, बोम्मईंचं विधान

“मुख्यमंत्री बोम्मई सोलापुरात येऊन गेले, पण त्या ठिकाणी कर्नाटक भवन बद्दल फार काही बोलले नाहीत. कोल्हापुरात कार्यक्रमाला आले, असता कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन बांधणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले”, असा मुद्दा सतेज पाटलांनी बैठकीत मांडला.

“10 दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र”, सुप्रिया सुळेंचा संताप, सीमावादाच्या झळा दिल्लीपर्यंत

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीत काय झालं? सतेज पाटलांचा सवाल

सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले, “दुसरीकडे 4 नोव्हेंबर 2022 रोजी इतिहासात कधी झाली नाही, अशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दोन्ही राज्यपालांची बैठक कोल्हापूरात झाली. त्याचा सविस्तर वृत्तांत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असेलच. तसेच तो वृत्तांत दोन्ही राज्य सरकारांकडेही नक्की पाठविला असणार आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती जनतेला कळणे गरजेचं आहे”, असं म्हणत सतेज पाटलांनी राज्यपालांच्या बैठकीबद्दल शंका उपस्थित केली.

“एकीकडे अशी बैठक होते आणि दुसरीकडे मात्र मराठी भाषिकांची मुस्कटदाबी केली जाते, याचे नेमके गौडबंगाल कळणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही राज्यपालांच्या बैठकीतील चर्चेची माहिती जनतेसमोर आणावी”, अशी मागणी सतेज पाटलांनी बैठकीत बोलताना केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT