'चल फूट शिरसाट, तुझ्यासारखे सतराशे साठ'; संजय शिरसाटांची शिवसेना आमदार दानवेंकडूनच पोलखोल

संजय शिरसाट यांनी एक पत्र लिहून उद्धव ठाकरेंसमोर तक्रारींचा पाढाच वाचला होता, त्यानंतर आता शिरसाट यांच्या जुन्या पोस्ट दाखवत उलट सवाल करण्यात आले आहेत.
Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath
Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath

शिवसेनेत बंड झालं. त्यानंतर शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून निधींपासून ते भेटीपर्यंत तक्रारींचा भलामोठा पाढाच वाचला. मात्र, आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्या जुन्या पोस्टवर बोट ठेवत पोलखोल केली आहे. दानवेंनी शिरसाटांना उलट सवालही केले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३८ आमदारांनी बंड केलं आहे. तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यानं या प्रकरणाभोवतीच राज्याचं राजकारण फिरत असून, बंड करणाऱ्या आमदार भूमिका मांडताना दिसत आहेत.

Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath
Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath

गुवाहाटीला गेल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी एक पत्र मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घ पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी निधी मिळत नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नसल्याचं आणि वर्षा बंगल्याबाहेर भेटीसाठी उभं राहावं लागत असंही म्हटलं होतं.

याच पत्रात संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी बडव्यांची मनधरणी करावी लागते, असंही म्हटलेलं होतं. संजय शिरसाट यांच्या याच पत्रावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांना लक्ष्य केलं आहे.

Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath
Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath
Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath
बडव्यांची मनधरणी, चाणक्य कारकून आणि...; उद्धव ठाकरेंना आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

बंडखोरी केल्यानंतर तक्रारी करणाऱ्या शिरसाट यांची सोशल मीडिया हॅण्डलच अंबादास दानवे यांनी खंगाळून काढल्या आहेत. जुन्या पोस्ट दाखवत अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट उलट सवाल केले आहेत.

अंबादास दानवे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डल केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पोस्ट टाकायला थोडा उशिरच झाला तरीही संजय शिरसाट यांनी पहिलं सांगावं, तुमचा ईमान कितीला विकलं गेलं?"

"अगदी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची भेट नाही होत. निधी नाही मिळाला, असा आरोप केलाय. माझ्यासोबत स्वतः मुख्यमंत्रीसाहेबांची आपण मागच्या काही दिवसात आपल्या मतदारसंघाच्या कामासंदर्भात भेट घेतली. बंडखोरी केल्यानंतर सोशल मीडिया हॅण्डलवर मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो डिलीट करु शकता. कमेंट सेक्शन बंद करु शकतात. संभाजीनगरला आल्यावर शिवसैनिकांना सामोरं जाऊ शकत नाही," असं दानवेंनी म्हटलंय.

Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath
Ambadas Danve Criticized Sanjay Shirsath

पुढे दानवे यांनी संजय शिरसाट यांना काही प्रश्नही विचारले आहेत. अंबादास दानवे म्हणतात,"तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन कुणी केलं?, मागे काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या पाणीपुरवठा बैठकीला तुम्ही होता की नाही?, वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाला होता की नाही?, सर्वात महत्त्वाचं जो हजारो कोटींचा विकास निधी तुमच्या मतदारसंघात मागच्या अडीच वर्षात दिला गेलाय, तो तुमची प्रॉपर्टी विकून किंवा रिक्षा चालवून आलेल्या पैशातून केलाय का? या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येईल का?," अशी प्रश्नांची सरबत्ती अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर केलीये.

अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर निधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानणारे ट्विटचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in