अंडरवेअरवरुन बॉयफ्रेंडवर भडकली महिला, सोशल मीडियावर घातला राडा
Women weird debate on social media :एका गर्लफ्रेंड आणि बॉय़फ्रेंडचा अंडरवियरवरून (underwear)वाद झाला होता. हा वाद घेऊन ती सोशल मीडियावर पोहोचली होती. या कपलच्या वादावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहे.
ADVERTISEMENT
Women weird debate on social media : गर्लफ्रेंड (Girl friend) आणि बॉयफ्रेंडमध्ये (Boy Friend) वाद होणे सहाजिक आहे. मात्र एका कपल भलत्याच गोष्टीवरून वाद घातला आहे. विशेष म्हणजे या कपलने हा वाद स्वत: पुरता मर्यादित ठेवला नाही, तर तो सोशल मीडियावर घेऊन आले आहे. आता नेटकरी या वादावर आपआपली प्रतिक्रिया देत आहेत.या प्रतिक्रियेनंतर कदाचीत शेवटी निष्कर्ष काढून या वादावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमका हा वाद काय आहे? यावर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, ते जाणून घेऊयात? (boyfriend underwear women weird debate on social media netizens respond reddits)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सध्या असे एक माध्यम बनत चालले आहे, ज्यावर अनेक लोक आपली समस्या मांडत आहेत. मग ते व्हिडीओच्या माध्यमातून असो अथवा फोटोच्या माध्यमातून असो.पण एक तरूणी एक विचित्रच मुद्दा घेऊन सोशल मीडियावर पोहोचलीय.त्याच झालं असं की, एका गर्लफ्रेंड आणि बॉय़फ्रेंडचा अंडरवियरवरून (underwear)वाद झाला होता. हा वाद घेऊन ती सोशल मीडियावर पोहोचली होती. या कपलच्या वादावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहे.
गर्लफ्रेंड (Girl friend) रेडीट अॅपवर गेली आणि तिने Askuk फोरमवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने तुम्ही अंडरवियर आणि मोजे दरदिवशी बदलता का? की फक्त अंघोळ करता तेव्हाच? असा प्रश्न तिने विचारला आहे. या तिच्या पोस्टर 500 लोकांनी भन्नाट कमेंट केली. काही नेटकऱ्यांनी अंडरवियर बदलने गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे, तर काहींनी अंडरवियर बदलण्याचा काही फरक पडत नाही, काही दिवस अंडरवियर नाही बदलली तर काय झाले,अशी भन्नाट मते नोंदवली आहेत.
हे वाचलं का?
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
किती विचित्र आहे तुझा बॉयफ्रेड,अशी कमेंट एका तरूणीने केली आहे. विचित्र माणूस आहे, माझ्या बॉयफ्रेंड सारखाच, अशी कमेंट एका दुसऱ्या महिलेने केली आहे. माणसाने दिवसातून एकदा तरी आंघोळ केली पाहिजे, जेणेकरून अंघोळ केल्याशिवाय अंडरवेअर बदलण्याची परिस्थिती उद्भवणार नाही असे मत देखील एका महिलेने नोंदवले आहे. काही लोकांचे असे देखील म्हणणे आहे की,आम्ही दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ अंघोळ करतो, आणि प्रत्येक वेळी अंडरवियर बदलतो. एका पेक्षा अधिक वेळ का अंघोळ करावी, यामुळे पाणी देखील वाया जाते णि त्वचेसाठी देखील चांगले नाही,असे मत एका नेटकऱ्याने नोंदवले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT