Aditya L1 Mission : चंद्रानंतर आता सूर्यावर ठेवणार पाऊल, काय आहे इस्त्रोचं आदित्य L1 मिशन?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrayaan 3 landing moon aditya l1 mission isros first solar mission know all about this mission
chandrayaan 3 landing moon aditya l1 mission isros first solar mission know all about this mission
social share
google news

Chandrayaan 3 Landing Moon : भारताच्या चांद्रयान 3 ची बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाली. या लँडिंगनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे,तर चंद्रावर पोहोचणारा चौथा देश आहे. भारताच्या या यशस्वी मोहिमेनंतर आता इस्त्रोची नजर सुर्यावर आहे. त्यामुळे आता चंद्रानंतर इस्त्रो सुर्यावर उतरण्याची तयारी करतो आहे. यासाठी इस्त्रोने आदित्य एल1 मिशनची घोषणा केली आहे. आता हे मिशन नेमके कसे असणार आहे, हे जाणून घेऊयात. (chandrayaan 3 landing moon aditya l1 mission isros first solar mission know all about this mission)

ADVERTISEMENT

मिशन काय?

चांद्रयान 3 च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगनंतर इस्त्रोने स्रुर्यावर उतरण्याची तयारी सुरु केली आहे.यासाठी इस्त्रोने आदित्य L1 मिशनची घोषणा केली आहे. या मिशनच्या माध्यमातून सुर्याचा अभ्यास केला जाणार आहे. हे आदित्य L1 यान ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुर्याभोवती पाठवण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Chandrayaan 3 Update : विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर 14 दिवस चंद्रावर काय करणार?

आदित्य L1 यान पृथ्वी आणि सुर्याच्या मधोमध पाठवले जाणार आहे. या मोहिमेत हे यान पृथ्वीच्या 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या लँग्रेज पाँईंट 1 (L1) भोवती एक पोकळ कक्षेत ठेवण्यात येणार आहे. L1 ही अशी जागा आहे, जिथे ग्रहणाचा कोणताही प्रभाव पडत नाही आणि येथून आपल्याला सुर्य दिसतो. या मिशनच्या माध्यमातून सुर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सुर्यावरील वातावरण, सौर ज्वाला, सौर वादळ, कोरोनिल हिंटींग, कोरोनल मास इजेक्शन यांसारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास या मोहिमेतून करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

आदित्य L1 नाव कसे दिले?

सुर्याला विविध नावांनी ओळखले जाते, त्य़ापैकी एक नाव म्हणजे आदित्य आहे. त्यामुळेच या मिशनला आदित्य नाव देण्यात आले आहे. तर L1 याचा अर्थ असा आहे की, सुर्य आणि पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण समसमान असणार आहे. या जांगना L1, L2, L3 अशी नावे देण्यात आली आहेत. तर आदित्य हे यान L1 जागी असणार आहे,त्यामुळे या मिशनला आदित्य L1 नाव देण्यात आले आहे. आदित्य L1मिशने हे भारताचे सोलार मिशन असणार आहे. या मिशनच्या माध्यमातून 5 वर्ष सुर्याचा अभ्यास केला जाणार आहे.चांद्रयान नंतर आता आदित्य L1 या मिशनची नागरीकांना उत्सुकता आहे.

हे ही वाचा : Chandrayaan -3 : चंद्रयान मोहिमेचा तुम्हा-आम्हाला काय फायदा होणार?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT