Chandrayaan 3 ची चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत एन्ट्री, आता फक्त 1437 किलोमीटर दूर!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इस्रोने चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ला चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवलं आहे. आता चांद्रयान 174 किमी x 1437 किलोमीटरच्या लहान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-3 कदाचित आपल्या निश्चित लक्ष्यापेक्षा पुढे जात आहे. मात्र इस्रोकडून (ISRO) अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. (Chandrayaan 3 third lunar orbit entry now only 1437 km away)

ADVERTISEMENT

5 ऑगस्ट 2023 रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर चंद्राचे पहिले फोटो जारी करण्यात आले होते. इस्रोने 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.40 वाजता कक्षा बदलली. याचाच अर्थ चांद्रयान-३ चे थ्रस्टर्स चालू झाले.

असं काय घडलं की, राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ दिला? लोकसभेत झाला प्रचंड गोंधळ

त्यावेळी चांद्रयान-3 चंद्राच्या चारही दिशांभोवती 164 x 18074 KM च्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत होते. हे 6 ऑगस्ट 2023 रोजी 170 x 4313 किमी कक्षेत कमी करण्यात आले होते. म्हणजेच, ते चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत पाठवण्यात आले.

हे वाचलं का?

चांद्रयान-3 चा अजून किती प्रवास बाकी?

  • 14 ऑगस्ट 2023: पहाटे बारा ते 12:04 पर्यंत चौथी कक्षा बदलली जाईल.
  • 16 ऑगस्ट 2023: सकाळी 8:38 ते 8:39 दरम्यान, पाचवी कक्षा बदलली जाईल.याचाच अर्थ, चांद्रयानाचे इंजिन फक्त एका मिनिटासाठी चालू राहतील.
  • 17 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चं प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.
  • 18 ऑगस्ट 2023: लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 4.45 ते 4.00 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेच्या उंची कमी होईल.
  • 20 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री पावणे दोन वाजता डि-ऑर्बिटिंग करेल.
  • 23 ऑगस्ट 2023: लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक राहिले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

हॉरर किलिंग! हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध, भररस्त्यावर वडील अन् भावाने…

चांद्रयान-3 वर बंगळुरूमधील इस्रोच्या सेंटर टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) च्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मधून सतत निरीक्षण केले जात आहे. सध्या चांद्रयान-३ ची सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत.

भारताच्या या चंद्र मोहिमेवर जगातील अंतराळ संस्था बारीक लक्ष ठेवून आहेत. तिसर्‍या कक्षेत जाण्यापूर्वी, इस्रोच्या अध्यक्षांनी चांद्रयान-3 च्या प्रवासाच्या अंतिम टप्प्याबद्दल विस्तृतपणे सांगितले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, ‘चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेपासून शेवटचे 100 किमी अंतर चांद्रयान-3 च्या भवितव्यासाठी खूप महत्वाचे असेल. 100 किमीचा हा प्रवास हे मिशन यशस्वी होणार की नाही हे ठरवेल.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT