“सावरकरांचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे’, शिंदे-फडणवीसांवर रघुनाथ पाटील का भडकले?
राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात सावरकरांवरून भाजप-शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रघुनाथ दादा पाटील यांनी यावरूनच प्रश्न केला आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे राज्यात सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापले. भाजप-शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा राज्यात काढल्या जात आहेत. दरम्यान, सावरकर गौरव यात्रेवरून शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. सावरकरांचं नाव घ्यायला तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, असं विधान रघुनाथ पाटील यांनी शिंदे-फडणवीसांवर टीका करताना केलं.
ADVERTISEMENT
शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांची सांगलीत पत्रकार परिषद झाली. यावेळी रघुनाथ पाटील यांनी महाविकास आघाडीवर वज्रमूठ सभेवरून, तर भाजप-शिवसेनेवर सावरकर गौरव यात्रेवरून निशाणा साधला.
सावरकर गौरव यात्रा : रघुनाथ पाटील शिंदे-फडणवीसांवर संतापले
रघुनाथ पाटील म्हणाले, “एकीकडे उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वज्रमूठ सभा होत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सावरकर प्रेम आलेलं आहे. सावरकरांचा विचार तुमच्याजवळ बिलकुल राहिलेला नाही. सावरकरांनी स्पष्ट सांगितलेलं की, गाय ही काही प्रवित्र प्राणी नाहीये.”
हे वाचलं का?
हेही वाचा – सावरकरांच्या त्यागाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; शरद पवार स्पष्टच बोलले
“गाय उपयुक्त पशू आहे आणि उपयुक्तता संपल्यावर कत्तलखान्याकडे ती जायला पाहिजे. तिच्या शरीराराचा कातडीचा, हाडाचा उपयोग लोकांना झाला पाहिजे. अशी भूमिका मांडणारे सावरकर एका बाजूला आणि त्यांचं नाव व फोटो घेऊन तुम्ही गोवंश हत्या बंदीचा कायदा आणता, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे सावरकरांचं नाव घ्यायला”, असा संताप व्यक्त करत रघुनाथ पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं.
महाविकास आघाडीला रघुनाथ पाटील यांचे खडेबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीकडून राज्यात वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर भाष्य करताना रघुनाथ पाटील म्हणाले, “हे इकडे अशी वज्रमुठ काढतात. काय केलं आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी? तुमच्या हातात साखर कारखानदारी आहे. तुमच्या हाती राज्य होते. आज तुमच्याकडे केंद्रात खासदार आहेत. या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात बोलत नाही यांची वज्रमुठ? कुणावर ही वज्रमुठ चालवली शेतकऱ्यांवर?”, असा सवाल रघुनाथ पाटील यांनी मविआच्या नेत्यांना केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सावरकरांना दाढी मान्य नव्हती, डॉ.मिंधे गुळगुळीत फिरणार का? संजय राऊतांचा सवाल
“आज एका-एका दोरीवर चार-चार शेतकरी फाशी घ्यायला लागले आहेत. लाज वाटायला पाहिजे, या राज्यकर्त्यांना आणि वज्रमुठीच्या सभा घेताना”, असा संताप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
‘माफी मागायला सावरकर नाही’, राहुल गांधींच्या विधानाने वादाला फुटलं तोंड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत माफी मागायला मी सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे आणि गांधी माफी मागत नाही, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं. राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना-भाजपची गौरव यात्रा सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT