Viral News: होणारी नवरी लग्नाआधीच गेली हनिमूनला, कारण...
Viral News : सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मर्फी नावाच्या महिलेने सांगितले की, लग्नाच्या एक महिना आधी तिच्या होणाऱ्या पतीचा मृत्यू झाला होता. या दुःखानंतर, मर्फीने तिची लंडनची ट्रीप रद्द केली नाही जी तिने आणि तिच्या होणाऱ्या पतीने हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
काय आहे नेमकी घटना?
एकट्या हनीमूनचा कसा होता अनुभव?
आपलं दु:ख सर्वासोबत का केलं शेअर?
Viral News : कंगना राणौतचा 'क्वीन' हा चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच पाहिला असेल ज्यासाठी कंगनाला 'राष्ट्रीय पुरस्कार'ही मिळाला होता. या चित्रपटात कंगनाचा होणारा नवरा अचानक लग्न करण्यास नकार देतो. पण त्या कठीण परिस्थितीत स्वत:ला सावरत कंगना एकटीच हनिमूनला जाण्याचा निर्णय घेते. ही एक फिल्मी कहाणी आहे पण अशीच एक खरी घटनाही घडली आहे. मात्र, ही स्टोरी क्वीनपेक्षा जास्त वेदनादायक आहे. कारण इथे तरूणी होणाऱ्या पतीच्या मृत्यूनंतर एकटीच हनिमूनला गेली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नेमकी घटना?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मर्फी नावाच्या महिलेने सांगितले की, लग्नाच्या एक महिना आधी तिच्या होणाऱ्या पतीचा मृत्यू झाला होता. या दुःखानंतर, मर्फीने तिची लंडनची ट्रीप रद्द केली नाही जी तिने आणि तिच्या होणाऱ्या पतीने हनिमून डेस्टिनेशन म्हणून निवडली होती. मर्फी होणाऱ्या पतीच्या आठवणीत एकटीच हनिमूनला गेली होती.
हेही वाचा : Crime Story: स्वप्नात तरूणाकडे मृतदेहाने मागितली मदत अन्... मानवी सापळ्याचे भयानक गूढ!
तिने तिच्या ट्रिपची एक क्लिपही सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'मी माझा प्रवास रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला कारण दु:ख आपल्याला एकटं पाडतं,' असं मर्फी क्लिपमधील व्हॉइसओव्हरमध्ये म्हणताना दिसतेय.
हे वाचलं का?
मर्फी पुढे म्हणाली, 'मला वाटले की कदाचित अशाच परिस्थितीतून गेलेल्या व्यक्तीशी मी संपर्क साधू शकेन.'
एकट्या हनीमूनचा कसा होता अनुभव?
फॉलो-अप व्हिडीओमध्ये, मर्फीने लंडनमधील तिच्या पहिल्या दिवसाची एक झलक शेअर केली, जिथे तिने तिच्या हॉटेलच्या खोलीत फेरफटका मारला आणि त्यादरम्यान मर्फीने सांगितले की तिचा होणारा पती तिच्यासोबत या ट्रिपमध्ये नाही आहे हे तिच्यासाठी खरोखरच वेदनादायक आहे.
ADVERTISEMENT
आपलं दु:ख सर्वासोबत का केलं शेअर?
मर्फीने पुढे स्पष्ट केले की तिने या ट्रिपचा व्हिडीओ बनवण्याचा का निर्णय घेतला. ती म्हणाली, 'दु:ख ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे आणि आज मला जे वाटत आहे ते उद्या मला वाटेल त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकते.'
ADVERTISEMENT
हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या किंमतींचा बाजारात नुसता धुरळा! बघूनच उडेल झोप; 1 तोळ्याचा भाव किती?
मर्फी तिच्या बॉयफ्रेंडबद्दल असंही म्हणाली की, "तो खूप निस्वार्थ होता, विशेष म्हणजे तेव्हा जेव्हा माझा विषय असायचा. तो नेहमी मला आनंदी करण्यासाठी जे काही शक्य होतं ते करायचा."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT