Ganesh Chaturthi 2024: बाप्पाची 'अशी' कराल मनोभावे पूजा तर, बिघडलेली कामंही होतील पूर्ण!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेश चतुर्थी 2024 च्या पुजेचा मुहूर्त कधी?

point

बाप्पाची 'अशी' करा मनोभावे पूजा

point

गणेश चतुर्थीचा सण किती दिवस साजरा करता येतो?

Ganesh Chaturthi 2024 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. सर्व पूजल्या जाणार्‍या गणपतीला पहिले मानले जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण जल्लोषात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला संपतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विसर्जन करतात. 2024 मध्ये गणेश चतुर्थीचा हा मुहूर्त कधी आहे? आणि पूजा, विधी याबाबत सर्वकाही आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेऊयात. (Ganesh Chaturthi 2024 Bring luck on ganesh Chaturthi find out how to perform Ganesh Chaturthi puja based on astrology)

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थी 2024 च्या पुजेचा मुहूर्त कधी?

2024 मध्ये गणेश चतुर्थी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजून 01 मिनिटांनी सुरू होईल आणि 07 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 37 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथी वैध असल्यामुळे गणेश चतुर्थी 07 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी साजरी केली जाईल. 

हेही वाचा : Maharashtra Bandh : 'या' तारखेला महाराष्ट्र बंद! मविआचा मोठा निर्णय

गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त 11 वाजून 3 मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी 01 वाजून 34 मिनिटांनी संपेल. पूजेसाठी एकूण कालावधी 02 तास 31 मिनिटे आहे.

हे वाचलं का?

गणेश चतुर्थीचा सण किती दिवस साजरा करता येतो?

गणेश चतुर्थी 1.5, 3, 5, 7, 10 किंवा 11 दिवस साजरी करू शकता. या कालावधीनंतर गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. 11 दिवसांनी बहुतेक गणपती विसर्जित केले जातात. त्या दिवसाला अनंत चतुर्थी असं म्हणतात.

हेही वाचा : Big Boss Marathi 5: 'माज, माज...' जान्हवीचं वागणं खटकलं, अभिनेत्रीचा पारा चढला अन्...

बाप्पाची 'अशी' करा मनोभावे पूजा

पहाटे उठल्यानंतर स्नान विधी आटपून घ्या. त्यानंतर गणपतीची छोटी मूर्ती घ्या. छोट्या चौरंगावर लाल आसनावर गणेश मूर्ती स्थापित करा. तीन वेळा आचमन करा आणि पाणी जमिनीवर सोडा. त्यानंतर गणपतीचं आव्हान करून मूर्तीवर गंगाजलने अभिषेक करा. गणपतीचा अभिषेक करत असातना ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करा गणपतीला लाल रंगाचं पुष्प अर्पित करा. गणपतीला शेंदूर आणि दूर्वा अर्पण करा. त्यानंतर 21 मोदकांचा नैवेद्य घ्या. तसेच पूजा करताना काही चूक झाली तर माफी करा असं गाऱ्हाणं घाला. दिवसभर जमल्यास उपवास धरा. तसेच गणपतीच्या मंत्रांचा जप करा.

ADVERTISEMENT


  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT