Gold Price Today: देवच पावला! गणेशोत्सवाआधी आज सोन्याच्या किंमतीत कोणता झाला मोठा बदल?
सणासुदीच्या काळात ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत कालच्या तुलनेत आज (3 सप्टेंबर) सोन्याचे भाव स्थिरावल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सणासुदीच्या काळात ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे.
आज (3 सप्टेंबर) सोन्याचे भाव स्थिरावले आहेत.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Rate : गणेशोत्सवाची सुरूवात या आठवड्यात होणार आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर आहेत. अशावेळी सणासुदीच्या काळात ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत कालच्या तुलनेत आज (3 सप्टेंबर) सोन्याचे भाव स्थिरावल्याचे दिसत आहे. चला तर मग 1 तोळा सोन्याचे भाव जाणून घेऊयात. (gold-silver prices today 3 September 2024 in maharashtra mumbai pune 10 gram rate know the details)
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव स्थिर असल्याने सोन्यात चांगली खरेदी दिसून येत आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर कपातीच्या संकेतांनंतर सोन्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार! IMD चा 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवरी (02 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 770 रूपये होता. अशावेळी आज यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावही तोच आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भावही 86,000 रूपये इतका आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती सतत बदलत असतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,570 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,570 रूपये आहे.
नागपूर
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,700 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,570 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,730 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,600 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Daily Horoscope : आज 'या' राशीच्या लोकांना लॉटरीच लागणार! समस्याही होतील दूर, पण...
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT