Maharashtra : अकोल्यात झाला अनोखा फॅशन शो, नटून-थटून चक्क बकऱ्यांनीच केला रॅम्प वॉक

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Akola District : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात एक मजेशीरच घटना घडली आहे. तुम्हालाही ते ऐकून हसू आवरणार नाही. अकोट शहरात मंगळवारी (12 सप्टेंबर) जेसीआय क्लबतर्फे एका अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोच्या रॅम्पवर कुठलीही सौंदर्यवती किंवा कोणती मॉडेल जाहिरात करण्यासाठी नव्हती तर चक्क बकऱ्या होत्या. प्राण्यांप्रती सर्वांची सद्भावना वाढावी आणि निसर्गातील सर्व प्राण्यांचा समतोल राखता यावा, यासाठीच बकऱ्यांच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. (In Akola district Goat’S fashion show and they walked on Ramp)

ADVERTISEMENT

याशिवाय प्रत्येकाने सजीवांशी भावनिक नातं जपलं पाहिजे हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश होता. तसंच शेळ्यांची जात, जीवनशैली, लसीकरण आणि शेळीपालनाचे फायदे याबद्दल शेतकरी वर्गाला जागरूक करण्यात आलं.

Maratha Morcha : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शिंदे-पवारांचा मोठा निर्णय

हे वाचलं का?

लाल रंगाचा रॅम्प, चारीबाजूंनी फुगे, सुंदर सजवलेल्या नटवून आणलेल्या बकऱ्यांना यावरून चालवण्यात आलं. अकोट शहरातील फॅशन शोचे हे फोटो आहेत. जेव्हा बकऱ्यांना त्यांच्या मालकांनी सजवून या रॅम्पवर चालवले. तेव्हा तिथे उपस्थित सर्व लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले, ‘असा फॅशन शो देखील होऊ शकतो का?’

Libya Floods: चक्रीवादळात मृत्यूचा तांडव, 6 हजारपेक्षा जास्त बळी, शहरच बनलं स्मशानभूमी

विशेषत: मेकअप म्हणजे महिलांच्या साज-शृंगाराचा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा तिथे उपस्थित महिलांनी असा फॅशन शो पाहिला आणि तोही बकऱ्यांसाठी, तेव्हा त्यांनाही हेवा वाटला की सुंदर बकऱ्या रॅम्पवर चालत आहेत. पण, त्यांनाही ते खूप आवडले आणि प्राणी हे आपल्या पृथ्वीचा आणि आपल्या निसर्गाचा एक भाग आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात बकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आल्याचे निरीक्षक महिला सरिता पाटील यांनी सांगितले. आपल्या पशुपालनाला एक नवा उत्साह, आनंद आणि चालना मिळत आहे. हे पाहून व समजून घेऊन शेळीपालन व्यवसाय करणारे शेतकरीही सुखावले आहेत. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांनी आपल्या बकऱ्या सजवून ढोल-ताशांच्या गजरात येथे आणल्यामुळे शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मान मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT