“अजित पवारांना मी सुद्धा हो म्हणालो होतो”, जितेंद्र आव्हाडांचं स्फोटक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

jitendra awhad says i had Supported ajit pawar on alliance with bjp
jitendra awhad says i had Supported ajit pawar on alliance with bjp
social share
google news

Maharashtra Political Upadates, Jitendra awhad : 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळणार, हे जवळपास निश्चित झालं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 51 आमदारांनी शरद पवारांना एक पत्र पाठवलं होतं. पण, पवारांनी निर्णयच घेतला नाही आणि राष्ट्रवादीची संधी गेली असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या बंडांची वर्षपूर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केले आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पडद्यामागे घडलेल्या घटनांची वाच्यता नेत्यांकडून केली जात असून, प्रफुल पटेल यांनी 2022 मध्येच शरद पवारांना भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी पत्र दिलं होतं, असं म्हटलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भूमिका मांडली.

वाचा >> NCP: अजितदादा आणि शरद पवारांसोबत किती आमदार?, ‘ही’ आकेडवारी बरंच काही सांगते!

प्रफुल पटेलांनी असा दावा केलाय की, “2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी करणारे पत्र शरद पवारांना दिले होते. पवारांनी निर्णय घेतला नाही आणि भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आले.”

हे वाचलं का?

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “असं आहे की, शरद पवारांना पत्र हे दिलं होतं की आपण विचार करावा. (भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा). शरद पवारांनी नाही म्हटल्यावर प्रश्नच येत नाही. शरद पवारांनाही माहितीये अजित पवारांची आदरयुक्त भीती, त्यांची दहशत, त्यांचा दरारा आहे. लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम. त्यामुळे लोक त्यांना तोंडावर नाही म्हणतच नाही.”

वाचा >> Shiv Sena: अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला छळतेय ‘ही’ भीती; वाचा Inside Story

“मी त्यांना हो म्हणालो होतो, पण मागे जाऊन मी ठरवलेलं की मी जाणार नाही. त्यांची दहशतच तेवढी आहे. त्यांना तोंडावर कोण नाही म्हणणार? प्रत्येकाला निवडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण जाऊ शकतो. त्यामध्ये काही मोठं नाही”, असं आव्हाड यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

माझ्या बापाच्या मालकीचं -आव्हाड

पक्ष कार्यालयावर दावे केले जात असून, त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझं कार्यालय माझ्या बापाच्या मालकीचं आहे. माझे वडील होते ना जिवंत तेव्हा घेतलेले कार्यालय आहे. प्रेमापोटी राष्ट्रवादीला दिलेलं कार्यालय आहे. कुणाच्या बापाचं नाहीये”, असं उत्तर जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ADVERTISEMENT

2022 च्या मध्यापासूनच भाजपसोबत सत्ता स्थापनेबद्दलची बोलणी सुरू झाली होती. शरद पवारांनी 51 आमदारांच्या पत्रावर वेळेत निर्णय न घेतल्याने एकनाथ शिंदे यांनी संधीचा फायदा घेतला आणि भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले. आम्ही देशहितासाठी भाजपसोबत गेलो असून, आमदारांना निधी वाटपासून इतर ज्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं, त्या आता सुटतील,” असंहीप पटेल म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT