Kalyan: ‘वेड्या बहिणीची, वेडी ही माया…’, माजी नगरसेविकेने 65 टक्के यकृत देऊन भावाचा वाचवला जीव!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Kalyan News A Women Donet Her livers 65% of Part to Her Brother And save his Life
Kalyan News A Women Donet Her livers 65% of Part to Her Brother And save his Life
social share
google news

Liver Transplant News: कल्याणमधील (Kalyan New) एका माजी नगरसेविकेने आपल्या यकृताचा 65 टक्के भाग देऊन भावाला जीवनदान दिलं. या घटनेनंतर “वेड्या बहिणीची वेडी ही माया” ह्या गाण्याचा अर्थ आज खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचला आहे. (Kalyan News A Women Donet Her livers 65% of Part to Her Brother And save his Life)

ADVERTISEMENT

अभिजीत भाबल आणि माधुरी काळे ही दोन सख्खी भावंडे आहेत. माधुरी शिक्षिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तर, अभिजीत महाराष्ट्र पोलीस विभागातील खेळाडू आहेत. भावाचे यकृत खराब झाल्याने दुसऱ्याच्या यकृताचा भाग बसवूनच त्याला जीवदान देणे शक्य असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

वाचा: Sanjay Raut : राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक! राणे समर्थक म्हणाला, ‘…तर डोकं फुटलं असतं’

बहिणीने भावाचं अशाप्रकारे केलं रक्षण…

संपूर्ण खराब यकृत काढून दुसऱ्या माणसाच्या यकृताचा भाग बसवणे हे अतिशय किचकट ट्रान्सप्लांट आहे. शस्त्रक्रियेसाठी डोनरचं यकृत पेशंटसाठी मॅच झाल्यानंतर डोनरलाही अनेक चाचण्यांना समोरे जावे लागते. काळजाचा तुकडा कापून देणं एवढं सोपं नाही, त्यासाठी जिगरच लागतं.

हे वाचलं का?

वाचा: Vishnu Deo Sai : अमित शाहांनी वचन पाळलं, साय यांच्याबद्दल काय केलं होतं विधान?

माधुरी काळे यांच्यात ते जिगर होतं म्हणून त्यांनी अनेक टेस्ट पास करून आपल्या बंधुला ६५% यकृत देऊन जीवनदान दिले आहे. मुलुंडच्या एका खासगी रुग्णालयात ही किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. 8 डिसेंबर रोजी माधुरी प्रशांत काळे यांना डिस्चार्ज मिळाला असून डॉक्टरांनी त्यांना काही महिन्यापर्यंत बेडरेस्ट करण्यासाठी सांगितले आहे.

वाचा: जरांगे-पाटील स्वतःला बॅरिस्टर समजतात की…?, सदावर्तेंनी कायद्याच्या भाषेत सुनावलं

भावासाठी न डगमगता दिली खंबीर साथ!

माजी नगरसेविका माधुरी काळे या व्यवसायाने शिक्षिका असून समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रात त्या सक्रिय असतात. आपल्या भावाचा जीव वाचविण्यासाठी आपण यकृत देण्यास तयार असल्याचे माधुरी यांनी स्वतः हून सांगितले. यानंतर आवश्यक चाचण्या करून ती डोनर होऊ शकते यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब करताच माधुरी यांनी न डगमगता वैद्यकीय परीक्षणासह शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व कठीण परीक्षांना हसत मुखाने सामोरे जात आपल्या यकृताचा ६५ टक्के भाग दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT